लंडन : असंख्य ग्रह-तार्यांनी भरलेल्या असंख्य आकाशगंगा या असीमित ब्रह्मांडात आहेत. (Space ) अशा स्थितीत केवळ पृथ्वीनामक एकाच ग्रहावर जीवसृष्टी आहे, (Space ) असे म्हणणे हे विहिरीतील बेडकाच्या मनोवृत्तीसारखेच म्हणजेच 'कुपमंडूक' वृत्तीसारखेच आहे. मात्र, अजूनही पृथ्वीशिवाय अन्यत्र जीवसृष्टी असल्याचे ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. त्यासाठी शोध सातत्याने सुरूच आहे. सूक्ष्म जीवांच्या रूपाने का होईना अन्य ग्रहांवर जीवसृष्टीचे अस्तित्व आहे का याचा शोध घेतला जात असतो. मंगळ ग्रहावरही सध्या असाच शोध सुरू आहे आणि विविध ग्रहांच्या चंद्रांवरही असा शोध घेतला जातो. आता गुरू ग्रहाच्या 80 पेक्षा अधिक चंद्रांपैकी काही मोठ्या ग्रहांकडे याच कार्यासाठी 'ज्युस' नावाचे अंतराळयान पाठवले जाणार आहे.
गुरू आणि शनी या दोन ग्रहांना 80 पेक्षाही अधिक चंद्र आहेत. (Space ) गुरूच्या कॅलिस्टो, गेनीमेड आणि युरोपा या चंद्रांचा आता अधिक तपशीलाने अभ्यास केला जाणार आहे. या चंद्रांवर महासागरांचे अस्तित्व आहे. 'ज्युस' हे अंतराळयान या तिन्ही चंद्रांजवळून जाणार आहे. ते गुरुवारी युरोपमधून लाँच केले जाणार असून आठ वर्षांचा दीर्घ प्रवास करून ते गुरूच्या चंद्रांजवळ जाईल.
'ज्युस' हे खरे तर एक सॅटेलाईट आहे जे चंद्रांचे दूरवरून निरीक्षण करून नोंदी घेईल. ही मोहीम युरोपमधील सर्वात मोठ्या अंतराळ मोहिमांपैकी एक आहे. फे्ंरच गयानामधून ते 13 एप्रिलला लाँच केले जाईल. हे यान 6.6 अब्ज किलोमीटरचा प्रवास करील व 2031 पर्यंत गुरूजवळ जाऊन पोहोचेल. 2034 मध्ये ते गेनीमेडच्या स्थायी कक्षेत प्रवेश करण्यापूर्वी तिन्ही चंद्रांजवळून 35 वेळा जाईल. 'ज्युस' मध्ये दहा उपकरणे आहेत. त्यांच्या सहाय्याने या चंद्रांचे निरीक्षण केले जाईल.