‘नेमेचि येतो मग पावसाळा’ असे असले, तरी दरवर्षी येणार्या पावसाळ्यात आरोग्याची नव्याने काळजी ही घ्यावीच लागते. पावसाळ्याच्या ऋतूमध्ये अनेक आजार पसरतात. यामध्ये बुरशी संसर्गामुळे होणार्या श्वसनाच्या आजारांचाही समावेश आहे. अस्थमा आणि ब्राँकायटिसची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. हवेतील परागकण, धुलीकण आणि ओलसरपणामुळे अॅलर्जीची समस्या उद्भवते. एखाद्या व्यक्तीला अशा अॅलर्जीमुळे दमा, ब्राँकायटिस, अॅलर्जीक राईनाइटिस आणि परागज्वर होण्याचा धोका अधिक असतो. पावसाळ्यातील अॅलर्जीचा धोका व त्यावरील उपायांची ही तज्ज्ञांनी दिलेली माहिती...
हवेतील दमटपणा आणि ओलावा हे बाथरूम आणि स्वयंपाकघशीच्या वाढीस कारणीभूत ठरते. शिंका येणे, खोकला येणे, डोळ्यातून पाणी येणे आणि श्वासोच्छवासाची समस्या यासारखी लक्षणे आढळतात.
खाज सुटणे, छातीत घरघर होणे आणि त्वचेवर पुरळ उठणे यासह अॅलर्जीक प्रतिक्रिया आढळून येते.
हे अॅलर्जीस कारणीभूत ठरते आणि नाक चोंदणे, घशाला खाज सुटणे आणि डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणे दिसून येतात.
: अॅलर्जीचा शोध घेण्यासाठी स्पायरोमेट्री (फुफ्फुसाचे कार्य चाचणी) आणि ब्राेन्कोप्रोव्होकेशन चाचणी, एक्स-रे, शारीरिक तपासणी आणि रक्त चाचण्या केल्या जातात. तज्ज्ञांकडून वैद्यकीय इतिहास जाणून घेतला जाईल आणि विशिष्ट अॅलर्जीचे निदानाकरिता लक्षणांचा अभ्यास केला जातो. वेळीच योग्य उपचार सुरू केल्यास भविष्यातील त्रास कमी होतो.
या स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधं घ्यावी लागतील. स्वत:च्या मर्जीने औषधोपचार करणं धोकादायक ठरू शकतं. पावसाळ्याच्या दिवसात अॅलर्जीचा धोका टाळण्यासाठी खाली दिलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करा.
1. घराची नियमित साफसफाई केल्यास अॅलर्जीची समस्या टाळता येते. घरात हवा खेळती राहील हे सुनिश्चित करा आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी ह्युमिडिफायर वापरा.
2. घर स्वच्छ आणि अॅलर्जीमुक्त ठेवण्यासाठी हेपा फिल्टरसह व्हॅक्यूम क्लिनर निवडून नियमितपणे व्हॅक्यूम करा आणि घरात धूळ जमा होऊ देऊ नका.
3. बुरशी संसर्ग टाळण्यासाठी, बाथरूम, स्वयंपाकघर आणि तळघरांमधील ओलसरपणा दूर करा. घरामध्ये लाकडी फर्निचर, भिंतीत ओलावा राहणार नाही याची खात्री करा.
4. घरातील झाडे बुरशी आणि परागकणांना कारणीभूत ठरू शकतात. त्यांना वेळोवेळी स्वच्छ करा आणि नियमितपणे पाणी बदला.
5. अॅलर्जीची शक्यता कमी करण्यासाठी सतत हात धुवा आणि स्वच्छ कपडे परिधान करून वैयक्तिक स्वच्छता राखा.
6. लक्षात ठेवा की, घरी पाळीव प्राणीदेखील अॅलर्जीस कारणीभूत ठरू शकतात. सर्दी, खोकला आणि शिंका येणे यासारखी लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
7. अँटिहिस्टामाइन्स, डिकंजेस्टंटस् आणि नाकातील कॉर्टिकोस्टिरॉईडस् अॅलर्जी व्यवस्थापित करण्यात मदत करतात. निरोगी राहण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अॅलर्जीचे शॉटस् घ्या.
8. संतुलित आहार आणि शरीर हायड्रेटेड राखल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.