विश्वसंचार

summer : पुढच्या वर्षी अधिकच कडक उन्हाळा?

Arun Patil

वॉशिंग्टन : जागतिक तापमानवाढ (summer) आता विक्राळ रूप घेत आहे. यंदाचा जुलै महिना तर इतिहासातील सर्वाधिक उष्ण होता असे म्हटले गेले. अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने यावर्षीचा जुलै महिना हा 1880 नंतरचा सर्वाधिक उष्ण (summer) महिना होता याला दुजोरा दिला आहे. यासह 'नासा'ने जगाला भविष्यातील एका धोक्याचा इशारा दिला आहे. तो म्हणजे, 2024 मध्ये उष्णता प्रचंड वाढणार आहे आणि त्यासाठी आपल्याला आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. जर योग्य तयारी केली नाही, तर अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागू शकतो असे 'नासा'ने स्पष्ट सांगितले आहे.

सध्या जग वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांचा सामना करत आहे. (summer) ज्यामुळे पृथ्वी संकटांच्या कचाट्यात आहे. जगभरातील देशांमध्ये तापमान वाढले असून, त्याच्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. 'नासा'चे प्रमुख बिल नेल्सन यांनी सांगितले आहे की, 'नासा'चा डेटा या गोष्टीची खात्री करत आहे की यावर्षी करोडो लोकांनी भयानक उष्णतेचा अनुभव घेतला आहे. जुलै महिना सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदवला गेला आहे. बिल यांनी सांगितले आहे की, अमेरिका असो किंवा अन्य देश सर्वजण हवामानाच्या संकटाचा सामना करत आहेत. यामागील कारणे, विज्ञान समजून घेण्याची गरज आहे. अन्यथा पृथ्वी राहण्यालायक असणार नाही.

आपल्याला आपल्यासह पृथ्वी आणि पर्यावरणालाही वाचवायचं आहे. यावर्षी 3 जुलै ते 7 ऑगस्टपर्यंत सलग 36 दिवस भयानक उष्णता होती. तापमानाचा पारा पूर्णपणे वाढलेला होता. वातावरणात जाणारे कार्बन उत्सर्जन आणि त्यासोबत अल-निनोचा प्रभाव या दोन गोष्टींमुळे जगात उष्णता वाढली आहे. अमेरिकेपासून ते चीनपर्यंत कोणत्याही देशात थंड वातावरण नाही. तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे. चीनमध्ये तर उष्णतेमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.

उष्णतेमुळे कॅनडा, रशिया, युरोप, आफ्रिका आणि अनेक बेटांवरील जंगलात आग लागली आहे. अमेरिका, मध्य-पूर्व, आशिया आणि युरोपमध्ये पावसाळी वादळं आणि पावसामुळे पूर आल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे, 'नोआ'च्या प्रमुख सारा कॅपनिक यांनी सांगितले आहे की, माणसाने जेव्हापासून उष्णतेची नोंद ठेवण्यास सुरुवात केली आहे, तेव्हापासून 2023 तिसरे सर्वात उष्ण वर्ष होते. यासह अल-निनोचा प्रभाव दिसणार आहे. 'नासा'च्या गोडार्ड इन्स्टिट्यूट फॉर स्पेस स्टडीजचे गैविन श्मिट म्हणतात की, 2024 मध्ये जास्त उष्णता असणार आहे. जर तापमानात 1.1 डिग्री सेल्सिअस वाढ जरी झाली तरी संकट येईल. सध्या तापमानात 0.4 सेल्सिअस वाढ झाली आहे.

.हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT