जगातील सर्वात महागडे मशरूम. Pudhari File Photo
विश्वसंचार

गुच्छी : जगातील सर्वात महागडे मशरूम काश्मीरमध्ये

जाणून घ्या सर्वात महागड्या 1 किलो मशरूमची किंमत

पुढारी वृत्तसेवा

श्रीनगर : मशरूमचा आहारातील वापर जुन्या काळापासूनच आहे. खाण्यास योग्य असलेल्या आळिंबीच्या अनेक टेस्टी डिशेस जगभरात प्रसिद्ध आहेत. ‘ड’ जीवनसत्वाचा हा एक चांगला स्रोत असल्यानेही अनेक लोक मशरूमचे सेवन करीत असतात. मात्र, जगातील सर्वात महागडे मशरूम कुठे आहे हे अनेकांना ठावूक असत नाही. असे मशरूम आपल्याच देशात, काश्मीरमध्ये मिळते. त्याला ‘गुच्छी मशरूम’ असे नाव आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये ते काश्मीरच्या पर्वतीय भागात उगवते. त्याची किंमत 40 हजार रुपये प्रतिकिलो आहे!

गुच्छी मशरूम प्रति किलो 40 हजार रुपये

जगात चांटेरेलेस, यार्त्सा गुंबू, तसेच युरोपियन व्हाईट ट्रफलसारखे अनेक महागडे मशरूम आहेत. मात्र, या सर्वांमध्ये गुच्छी मशरूमचे स्थान वेगळे आहे. ते दक्षिण आणि उत्तर काश्मीरमध्ये मिळते. त्याची शेती केली जात नाही, तर ते नैसर्गिकपणेच डोंगराळ भागात उगवते. इंग्रजीत त्याला ‘मोरेल्स’ असे म्हटले जाते. हे मश‘म शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते व त्यामुळेही त्याची किंमत अधिक आहे. पुलवामा जिल्ह्यातील अरिपाल नावाच्या गावात अशा गुच्छी मशरूमची प्रामुख्याने विक्री होते. तेथील लोक असे मशरूम शोधून काढतात व ते तोडून वाळवतात. त्यानंतर त्याची विक्री केली जाते. चांगल्या दर्जाच्या गुच्छी मशरूमला 40 हजार रुपये प्रति किलोचीही किंमत मिळते. या मशरूमचा वापर अनेक प्रकाराच्या खाद्यपदार्थांमध्ये होतो. चायनीज, अरेबिक आणि इटालियन पदार्थांमध्येही ते वापरले जाते. मात्र, काश्मीर जेवणातील त्याचा वापर अतिशय स्वादिष्ट असतो. पुलाव, कोरमा किंवा स्टफ करून तिथे या मशरूमचे पदार्थ बनवले जातात. खास प्रसंगी किंवा मोठे पाहुणे घरी येणार असतील, तर या मशरूमचे पदार्थ बनवले जातात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT