बदकासारखे तोंड असलेल्या डायनासोरचे जीवाश्म Pudhari Photo
विश्वसंचार

बदकासारखे तोंड असलेल्या डायनासोरचे जीवाश्म

पुढारी वृत्तसेवा

मेक्सिको सिटी ः कोट्यवधी वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या डायनासोरच्या विविध प्रजातींचा अद्यापही शोध लागत असतो. आताही मेक्सिकोमध्ये बदकासारखे तोंड असलेल्या डायनासोरचे जीवाश्म सापडले आहे. या डायनासोरच्या नाकाची रचना अनोखी आहे. या डायनासोरला ‘कोहुलासौरस लिपानी’ असे वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे.‘लिपानी’ हे नाव संबंधित जीवाश्म ज्याठिकाणी सापडले त्यावरून तसेच तेथील लिपानी अपाचे या आदिवासी समुदायावरून देण्यात आले आहे.

या डायनासोरच्या जबड्यात दातासारखे काटे होते. 7 कोटी 30 लाख वर्षांपूर्वीची कठीण झाडे खाण्यासाठी त्यांना या काट्यांचा उपयोग होत असावा. सी. लिपानीच्या कवटीचा अंशिक भाग खरे तर 1980 च्या दशकातच पॅरस बेसिनमध्ये संशोधकांना सापडला होता. मात्र, त्यावेळी त्याला एका वेगळ्या कुळाशी संबंधित ठरवण्यात आले होते. आता यावर नवे संशोधन झाले असून, ही एक वेगळी प्रजाती असल्याचे निष्पन्न झाले. या संशोधनाची माहिती ‘डायव्हर्सिटी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिको येथे ठेवण्यात आलेले हे जीवाश्म त्यासाठी नव्याने अभ्यासण्यात आले. क्लौडिया सेरानो यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे संशोधन झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT