डोळे का फडफडतात? ‌‘या‌’ पोषक तत्त्वांच्या कमतरतेचा संकेत शक्य (Pudhari File Photo)
विश्वसंचार

Eye Twitching Causes | डोळे का फडफडतात? ‌‘या‌’ पोषक तत्त्वांच्या कमतरतेचा संकेत शक्य

डोळ्यांची फडफडणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्याचा अनुभव बहुतेकांना कधीतरी येतोच.

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : डोळ्यांची फडफडणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्याचा अनुभव बहुतेकांना कधीतरी येतोच. अनेक लोक याला शकुन-अपशकुनाशी जोडतात, परंतु वैद्यकीय विज्ञान याकडे वेगळ्या दृष्टीने पाहते. डोळ्यांचे फडफडणे हे आपल्या शरीरातील एखाद्या महत्त्वाच्या पोषक तत्त्वाच्या कमतरतेचे संकेत असू शकतात.

वैद्यकीय भाषेत याला ‌‘मायोकिमिया‌’ म्हणतात. यामध्ये पापण्यांच्या स्नायूंमध्ये वारंवार आणि अनियंत्रितपणे आकुंचन होते. सामान्यतः ही समस्या थोड्या वेळासाठी टिकते, परंतु काही लोकांमध्ये ती सतत राहू शकते आणि अशा स्थितीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. डोळे फडफडण्याचे सर्वात मोठे कारण तणाव आणि झोपेची कमतरता आहे. परंतु, त्या व्यतिरिक्त, हे शरीरातील काही आवश्यक पोषक तत्त्वांच्या कमतरतेचेही संकेत असू शकते. शरीराची ही एक प्रकारची ‌‘अलार्म सिस्टीम‌’ आहे, जी आपल्याला सांगते की आपल्या जीवनशैलीत किंवा आहारात काहीतरी गडबड आहे. मॅग्नेशियम हे एक महत्त्वाचे खनिज आहे, जे आपले स्नायू आणि मज्जातंतू योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक आहे. शरीरात मॅग्नेशियमचे प्रमाण कमी झाल्यावर, स्नायू आणि मज्जातंतूंच्या पेशी अति-सक्रिय होतात, ज्यामुळे पापण्या फडफडू लागतात.

मॅग्नेशियमप्रमाणेच पोटॅशियम देखील एक आवश्यक इलेक्ट्रोलाइट आहे, जो स्नायूंचे आकुंचन आणि मज्जातंतूंच्या संकेतांना नियंत्रित करतो. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये अनियंत्रित पेटके येऊ शकतात, ज्याचा परिणाम डोळ्यांच्या पापण्यांवरही दिसू शकतो. व्हिटॅमिन बी12 आपल्या मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे मज्जातंतूंच्या पेशींना नुकसान पोहोचू शकते, ज्यामुळे स्नायूंमध्ये पेटके आणि डोळे फडफडणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ही कमतरता अनेकदा शाकाहारी लोकांमध्ये जास्त दिसून येते. जर डोळे फडफडणे हे कोणत्याही पोषक तत्त्वाच्या कमतरतेमुळे होत नसेल, तर अन्यही काही गोष्टी कारणीभूत असू शकतात: तणाव आणि थकव्यामुळे शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढते, ज्यामुळे मज्जासंस्था उत्तेजित होते आणि डोळ्यांचे स्नायू अधिक संवेदनशील बनतात. संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईलसमोर सतत काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो. यामुळे डोळे थकतात आणि पापण्यांचे स्नायू अनैच्छिकपणे आकुंचन पावू लागतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT