नवी दिल्ली (पुढारी वृत्तसेवा):
कधी असे झाले आहे का, की तुम्ही एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहात, पण तुमचे मन सारखे इतर विवंचनांमध्ये अडकलेले आहे? एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी जास्त वेळ लागत असेल, मीटिंगमध्ये सांगितलेल्या गोष्टी समजण्यात अडचण येत असेल किंवा छोटे-छोटे निर्णय घेणेही कठीण वाटू लागले असेल? अशा स्थितीला अनेकजण 'ब्रेन फॉग' असे म्हणतात.
ही स्वतःहून कोणतीही वेगळी आजार किंवा औपचारिक वैद्यकीय निदान नसून, लक्ष, स्मरणशक्ती आणि मानसिक स्पष्टेशी संबंधित समस्यांचे वर्णन करणारा एक शब्द आहे.
एंजायटी (चिंतेचा विकार) दरम्यान असे अनुभव येऊ शकतात. भविष्याद्दल सतत भीती बाळगणे, एकाच गोष्टीचा वारंवार विचार करणे आणि पुरेशी झोप न लागणे यामुळे मज्जेच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
तथापि, ब्रेन फॉगमागे केवळ एंजायटीच कारणीभूत असते असे नाही; झोपेची कमतरता, काही औषधे आणि इतर आरोग्य समस्याही यामागचे कारण असू शकतात. एंजायटीच्या स्थितीत व्यक्तीचे लक्ष सहसा एखाद्या संभाव्य धोक्याकडे, समस्येकडे किंवा अनिश्चिततेकडे जाते. उदाहरणार्थ, ऑफिसमधील एखाद्या महत्त्वाच्या कामाची जवळ आली असेल, कुटुंबाची काळजी असेल किंवा आरोग्याविषयी भीती कायम असेल, तर मन वारंवार त्याच विचारंकडे परत जाते.
यामुळे सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपलब्ध असलेली मानसिक ऊर्जा कमी पडू शकते. जर मनात सतत चिंता सुरू असेल, तर व्यक्ती एखाद्या निर्णयाच्या प्रत्येक संभाव्य परिणामाचा अतिविचार करू शकते. उदाहरणार्थ, साधा पर्याय निवडतानाही चुकीचा निर्णय तर होणार नाही ना, अशी वारंवार शंका येऊ शकते.
यामुळे निर्णय घेण्यास उशीर होतो आणि आत्मविश्वासात कमतरता जाणवू शकते. एनसीबीआयमानुसार, जर एंजायटीसोबत मानसिक धुके (ब्रेन फॉग) जाणवत असेल, तर दैनंदिन दिनचर्येत काही बदल केल्यास मदत होऊ शकते. मात्र, हे उपाय कोणत्याही आवश्यक वैद्यकीय किंवा मानसिक आरोग्याच्या उपचारांना पर्याय ठरू शकत नाहीत.