गुवाहाटी : येथील आयआयटी अर्थात भारतीय प्राद्योगिकी संस्थानातील काही संशोधकांनी महत्त्वाचे निष्कर्ष मिळवले आहेत. त्यांनी इस्रोच्या युआर राव सॅटेलाईट सेंटर आणि इस्रायलच्या हायफा विश्वविद्यालयाच्या संयुक्त प्रयत्नांनी एका ब्लॅकहोल म्हणजेच कृष्णविवरामधून उत्सर्जित होणार्या ‘एक्स-रे सिग्नल पॅटर्न’ला डिकोड करण्यात यश मिळवले आहे. ‘जीआरएस 1915+105’ या कृष्णविवराचे मूळ अंतर पृथ्वीपासून 28000 प्रकाशवर्षे दूर असल्याचं या निरीक्षणातून सांगण्यात आलं.
संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी असणार्या संशोधनकर्त्यांच्या माहितीनुसार भारतीय अंतराळ वेळशाळेला मिळालेल्या माहितीचा वापर करत संशोधनकर्त्यांनी कृष्णविवरामधून निघणार्या एक्स रेला चकाणार्या मंद लहरींमध्ये रुपांतरित होताना पाहिलं. या संशोधनाच्या निष्कर्षांवर आधारित माहिती दैनिक ‘मंथली नोटिसेज ऑफ द रॉयल एस्ट्रोनॉमिकल सोसायटी’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. जगभरातील संशोधकांकडून कृष्णविवरासंदर्भातील माहितीवर अध्ययन सुरू असून त्यातू बर्याचदा काही अनपेक्षित स्वरुपातील माहिती समोर येताना दिसते. जेव्हा कृष्णविवर विविध तार्यांच्या बाह्य थरांमधून वायू शोषतात तेव्हा ते अधिक उष्मा आणि एक्स-रे अर्थात क्ष किरणं उत्सर्जित करतात. याच क्ष-किरणांच्या माध्यमातून संशोधकांना कृष्णविवर आणि त्याच्या आजूबाजूला असणार्या वातावरणाची माहिती मिळण्यास मदत होत आहे.
आयआयटी गुवाहाटीच्या भौतिकशास्त्र विभागाशी संलग्न संशोधक आणि अध्ययनकर्त्यांच्या माहितीनुसार या निरीक्षणादरम्यान या एक्स-रेमुळं बरीच माहिती समोर आली आहे. संशोधनकर्त्यांनुसार ज्या कृष्णविवराचे निरीक्षण करण्यात आलं, त्यातून निघणारा उजेड दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये बदलताना दिसला. ज्यपैकी एक स्रोत अतिशय चकाकणारा आणि दुसरा मंद प्रकाशाच चमकणारा होता. ज्यावेळी हे स्रोत चकाकण्याच्या टप्प्यात असतात आणि त्यांचा झगमगाट अधिक असतो तेव्हा कोरोना (कृष्णविवराच्या नजीक असणारा वायूंचा थर) अतिशय उष्ण असतो. उलटपक्षी जेव्हा मंद टप्पा सक्रिय होतो तेव्हा हा कोरोना थंड होण्यास सुरुवात होते आणि त्यामुळं झगमगाटसुद्धा दिसेनासा होतो. ही प्रक्रिया स्पष्ट सांगू पाहते की, हे इशारे संभवत: कोरोनातूनच उत्पन्न होत आहेत. जिथं प्रत्येक टप्पा काही ‘शे’ सेकंद सुरू राहिला आणि नियमित स्वरुपात या प्रक्रियेची पुनरावृत्ती झाली.
या संशोधनातून एक बाब स्पष्ट होत असून कृष्णविवराच्या चारही बाजूंंना कोरोनासम कोणती स्थायी संरचना नसून त्याचा आकार आणि उर्जा कृष्णविवरामधील प्रवाहित होणार्या वायूंवर आधारित आहे. संशोधनकर्त्यांच्या माहितीनुसार या निरीक्षणातून कृष्णविवराच्या किनार्यावरअसणारं अत्याधिक गुरुत्वाकर्षण, त्याची तीव्रता आणि उच्च तापमानाची माहिती मिळते. याशिवाय विविध आकाशगंगांमध्ये होणारा विकास यामुळं नेमका कसा प्रभावित होतो हेसुद्धा यातून स्पष्ट होत आहे.