पक्ष्यांची ‌‘सामूहिक आत्महत्या‌’? (Pudhari File Photo)
विश्वसंचार

Bird Mass Ended Life Assam | पक्ष्यांची ‌‘सामूहिक आत्महत्या‌’?

आसाममधील जतिंगा गावाचे रहस्य कायम

पुढारी वृत्तसेवा

गुवाहाटी : आसाम राज्य हे जगभर प्रसिद्ध असलेले एक पर्यटन स्थळ आहे. आसाम हे इतिहास, संस्कृती आणि निसर्गाचा सुंदर संगम असलेले एक अद्भुत ठिकाण आहे. पण यासोबतच, येथे काही रहस्यमय गोष्टीही आहेत, ज्या एखाद्या कथेपेक्षा कमी वाटत नाहीत. यापैकीच एक आहे जतिंगा नावाच्या एका छोट्या गावात घडणारी अनोखी आणि गूढ घटना, जी आजही लोकांना चकित करते. या गावात पक्षी आत्महत्या करतात असे म्हटले जाते!

आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्याच्या सुंदर टेकड्यांमध्ये जतिंगा हे गाव वसलेले आहे. हे गुवाहाटीपासून सुमारे 330 किलोमीटर दक्षिणेस आणि हाफलांग शहरापासून केवळ 9 किलोमीटर दूर आहे. शांत आणि सुंदर नैसर्गिक दृश्यांसाठी ओळखले जाणारे हे गाव जगातील सर्वात रहस्यमय ठिकाणांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे, विशेषतः पक्षी संशोधक आणि साहसी पर्यटकांमध्ये. दरवर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यांदरम्यान, संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत येथे एक विचित्र घटना घडते. येथे अनेक स्थलांतरित पक्षी अचानक खाली कोसळतात आणि त्यांचा मृत्यू होतो. हे रहस्यमय ‌‘पक्ष्यांचे मृत्यू‌’ अनेक दशकांपासून स्थानिक लोक आणि वैज्ञानिकांना कोड्यात पाडत आहेत. आजही यामागे कोणतेही ठोस कारण सापडलेले नाही. या महिन्यांमध्ये जतिंगाच्या टेकड्या धुके आणि ढगांनी वेढलेल्या असतात.

याच दरम्यान, टायगर बिटरन, किंगफिशर, लिटल एग््रेाट, ब्लॅक ड्रोन, ग््राीन पिजन, हिल पार्ट्रिज, एमराल्ड डव आणि नेकलेस्ड लाफिंग थश यांसारखे अनेक पक्षी अचानक गावाकडे वेगाने उडत येतात. यातील विचित्र गोष्ट अशी आहे की, हे पक्षी बांबूचे खांब, झाडे किंवा घरांना धडकतात आणि अनेकदा त्यांचा जागीच मृत्यू होतो. दरवर्षी एकाच वेळी अशा घटना वारंवार घडणे, हे मोठे रहस्य बनले आहे. जगभरातील वैज्ञानिक आणि पक्षीप्रेमी या अनोख्या घटनेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अद्याप ठोस कारण समोर आलेले नाही. प्रसिद्ध पक्षी विशेषज्ञ अनवरुद्दीन चौधरी यांनी त्यांच्या ‌‘द बर्डस्‌‍ऑफ आसाम‌’ या पुस्तकात लिहिले आहे की, मान्सूनच्या काळात तीव वारे आणि दाट धुके यामुळे लहान आणि नवीन पक्षी भरकटतात. रस्ता चुकलेले हे पक्षी गावातील प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि मग बांबूचे खांब किंवा घरांना धडकून मरतात. 1960 च्या दशकात प्रसिद्ध निसर्गशास्त्रज्ञ ई.पी. जी यांनीही याच निष्कर्षाला दुजोरा दिला होता.

काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जतिंगा परिसरातील जमिनीखालील पाण्यामुळे तयार होणाऱ्या विशिष्ट चुंबकीय प्रभावामुळे पक्ष्यांची दिशा ओळखण्याची क्षमता बिघडते. काही लोकांचा असा विश्वास आहे की आसाममध्ये दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे पक्ष्यांचे नैसर्गिक निवारे नष्ट होतात, ज्यामुळे ते जतिंगाच्या दिशेने उड्डाण करतात. गावात लावले जाणारे तेजस्वी दिवे आणि टेकड्यांवरील सर्चलाइटस्‌‍ पक्ष्यांना आपल्याकडे खेचून घेतात. गोंधळलेले पक्षी प्रकाशाच्या दिशेने उडतात आणि अपघाताने मरतात, असेही काहींना वाटते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT