Virat's Viral Video  
Latest

Virat’s Viral Video : विराटच्या रुमचा व्‍हिडिओ बनविणार्‍या कर्मचार्‍यावर हॉटेलने केली कारवाई

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने हॉटेल क्राऊनमध्ये मुक्काम केला होता. विराटचा चाहता असणार्‍या या हॉटेलमधील कर्मचार्‍याने विराटच्‍या रुमचा व्‍हिडोओ शूट करत  तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यावर विराट कोहलीने संतीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता या प्रकरणी हॉटेल क्राऊनने माफी मागितली आहे. तसेच व्हिडिओ शूट करणाऱ्या संबंधित कर्मचार्‍यांवर हॉटेल प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. (Virat's Viral Video)

याबाबत हॉटेल क्राऊनचे प्रवक्ते म्हणाले, "आम्ही या प्रकराबद्दल विराट कोहलीची विनाशर्त माफी मागतो. सोबतचं असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी आमच्याकडून पाऊले उचलली जातील. याबाबत आम्ही संबंधितांवर कारवाईही केली आहे. व्हिडीओ शूट करणाऱ्या संबंधित व्यक्तीला आम्ही हॉटेल क्राऊनमधून हटवले आहे. " (Virat's Viral Video)

हॉटेल स्टाफवर भडकली अनुष्का (Virat's Viral Video)

हॉटेल क्राऊनमधील हे प्रकरण समोर आल्यानंतर विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अणुष्का शर्मानेही प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीची इन्स्टाग्राम पोस्ट अनुष्काने शेअर केली आहे. पोस्ट शेअर करताना ती म्हणाली, अशा प्रकारांना अनेकदा सामोरे जावे लागले आहे. अशा प्रकारे व्हिडीओ शूट करणे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत.

Virat on privacy : प्रायव्हसी मनोरंजनाची वस्‍तू नाही…

मला माझ्या स्वतःच्या हॉटेलच्या रूममध्ये प्रायव्हसी ठेवता येत नसेल, तर मी माझ्या वैयक्तिक ठिकाणी प्रायव्हसी कशी ठेवू. प्रायव्हसीसाठी कुठल्या जागेची अपेक्षा करू? असाही प्रश्न किंग कोहलीने उपस्थित केला आहे. मी अशा प्रकाराच्या विरूद्ध आहे. तरी कृपया लोकांचा आणि त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करा. त्यांना मनोरंजनाची वस्तू समजू नका, असे म्हणत किंग कोहलीने संबंधित चाहत्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Virat's Viral Video)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT