Virat kohli : विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतून बाहेर?  
Latest

Virat kohli : विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतून बाहेर?

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर खेळणार आहे. श्रीलंकेचा संघ भारतात तीन टी-२० आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण या दौ-याआधी टीम इंडियासाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत सहभागी होणार नसल्याची माहिती मिळत आहे. तर अष्टपैलू रवींद्र जडेजा संघात पुनरागमन करेल असे समजते आहे.

क्रिकेट वेबसाईट क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीतून सावरला आहे. श्रीलंकेविरुद्ध २४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेतून तो टीम इंडियामध्ये पुनरागमन करेल. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये प्रदीर्घ पुनर्वसनानंतर रवींद्र जडेजा लखनऊला पोहोचला आहे. येथे तो क्वारंटाईनमध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी २० मालिकेतील पहिला सामना २४ फेब्रुवारीला लखनऊमध्ये खेळवला जाणार आहे.

जडेजाला नोव्हेंबरमध्ये दुखापत झाली होती… (virat kohli)

नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीदरम्यान रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती. यानंतर तो दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकला. तर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सध्याच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठीही त्याची निवड झाली नाही.

विराट कोहलीला विश्रांती देण्याची शक्यता…

भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात २४ फेब्रुवारीला पहिल्या टी-२० सामन्याने होणार आहे. यानंतर पुढील दोन सामने हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे होणार आहेत. हे दोन्ही सामने २६ आणि २७ फेब्रुवारीला खेळवले जाणार आहेत. माजी कर्णधार विराट कोहलीला टी २० मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र, तो कसोटी मालिकेत भाग घेणार असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT