Latest

Virat kohli : विराटचा ‘वन डे’मध्ये मोठा धमाका; सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत टॉप 5 मध्ये

अमृता चौगुले

 पुढारी ऑनलाईन डेस्‍क : श्रीलंका विरुद्धच्या तिसर्‍या वनडे सामन्यात कोहलीने 63 धावा करताच, तो वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल पाचमध्ये पोहोचला आहे. विराटने श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेला मागे टाकत टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे. या सामन्यात विराटने दीड शतकी खेळी करत 110 चेंडूत  166 धावा केल्या.

महेला जयवर्धनेने वनडे सामन्यांमध्ये 448 सामन्यात एकूण 12650 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आता कोहलीने त्याला मागे टाकले आहे. विराटने 268 सामन्यात 12754 धावांचा टप्‍पा पूर्ण केला आहे. वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. त्याने 463 सामन्यांमध्ये 18426 धावा केल्या आहेत. आता पाचव्या स्थानी विराट कोहली पोहचला आहे. (Virat kohli)

वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू (Virat kohli)

1. सचिन तेंडुलकर – 463 सामने, 18426 धावा
2. कुमार संगकारा – 404 सामने, 14234 धावा
3. रिकी पाँटिंग – 375 सामने, 13704 धावा
4. सनथ जयसूर्या – 445 सामने, 13430 धावा
5. विराट कोहली – 268 सामने – 12754

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT