virushka 
Latest

Virushka in Dubai : 2022 ची शेवटची संध्याकाळ दुबईमध्ये! विरुष्काने शेअर केला खास फोटो

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण देश नव्या वर्षाचे स्वागत करायला सज्ज झाले आहे. (Virushka in Dubai) यामध्ये बॉलिवूड स्टार आणि स्पोर्ट्समनदेखील मागे नाहीत. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा देखील नव्या वर्षाची सुरुवात करायला परदेशात रवाना झाले आहेत. या कपलसोबत त्यांची मुलगी वामिकादेखील आहे. वामिकाचे पहिले न्यू ईअर सेलिब्रेशन असणार आहे. दोघेही दुबई टूरवर आहेत. या कपलने व्हेकेशनहून काही फोटो इन्स्टाला शेअर केले आहेत. (Virushka in Dubai)

विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करताना लिहिले आहे- To the last sunrise of 2022 ❤️. तसेच अनुष्काने देखील दुबईतून दोघांचा फोटो शेअर केला आहे. अनुष्काने हा फोटो शेअर करताना म्हटले आहे- This city, us, last night ?✨

विराट कोहलीने आपल्या परिवारासोबत दुबईमध्ये २०२२ ची अखेरची संध्याकाळ साजरी केली. नववर्षाच्या स्वागतासाठी दोघेही दुबई पोहोचले आहेत. 'परी' फेम अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर सूर्याची झलक दाखवत वर्षाची शेवटची संध्याकाळ पाहत आहोत, असा मेसेज केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT