पुढारी ऑनलाईन डेस्क
सोशल मीडियावर एक थरारक व्हिडिओ व्हायरल (Viral video) होत आहे. बिबट्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ वन अधिकारी परवीन कासवान (IFS officer Parveen Kaswan) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यातील थरारक दृश्य पाहून अंगावर काटा येतो. "तो बिबट्या पाहा. इतरांना संधी मिळत नाही," (See that leopard. Others don't stand a chance) अशी कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय.
घराच्या गेटबाहेर बिबट्या आलेला पाहून गेटच्या आतील कुत्रा भुंकायला लागतो. पण काही क्षणातच कुत्रा तेथून पळ काढतो. त्याचबरोबर बिबट्या गेटवरून उडी मारुन घराच्या आवारात प्रवेश करतो आणि तो कुत्र्याचा पाठलाग करतो. पण दुर्दैवाने, बिबट्या कुत्र्याला आपली शिकार बनवतो. आणि तो त्याला गेटवरून उडी मारून ओढून घेऊन जातो. बिबट्याचा हा थरारक हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हा व्हिडिओ (Viral video) ७१ हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून काहींना धक्का बसला आहे. बिबट्या पोहोचू शकेल अशा ठिकाणी घराबाहेर कुत्र्याला ठेवणे किती असंवेदनशील आहे, अशा प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहून अनेकांनी दिल्या आहेत.
हे ही वाचा :