Latest

सिंदूर : ‘या’ सीनमुळे फिजिक्सची लागलीय पूर्ण वाट! नेटकर्‍यांकडून कमेंटचा पाऊस

backup backup

एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानोगे, या संवादाचे अनेक चित्रपट, नाटक, मालिका आपण  पाहिल्‍या आहेत. चित्रपटांनूसार या सिंदुरची एवढी किंमत आहे की, चुकूनही कोणाच्या डोक्याला लागले की त्यांचे लग्नच होते. हे पवित्र नातं देवानेच तयार केलं असल्याचं मानलं जात. आता काही दिवसांपासून सोशल मीडियावर असाच एक सिंदूरचा म्हणजेच कुंकवाचा सीन व्हायरल होतं आहे.

काही दिवसांपूर्वी Colors TV ने ट्विटर आणि इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला.  'थपकी प्यार की' या मालिकेतील हा सीन आहे. या व्हिडिओत अभिनेता  पाय घसरुन पडत असलेला दिसतो. त्याच्या समोरच असणार्‍या अभिनेत्रीसमोर कुंकवाचा करंडा आहे. अभिनेता पाय घसरुन पडत असताना चुकून त्याच्या हात कुंकवाच्‍या करंड्याला लागताे. यानंतर ताेच हात अभिनेत्रीच्‍या कपाळाला लागताे. विशेष म्‍हणजे पाय घसरुनही ताे पडत नाही, हे मालिका दिग्‍दर्शकाचे लॉजिक पाहून अनेकांनी फिजिक्सचा मृत्यू झाला का, अशा कमेंट केल्या आहेत. पहिल्यांदा हा व्हिडिओ तर पाहून घ्या.

काय आहेत नेटकर्‍यांच्‍या प्रतिक्रिया ?

काहींनी याला 'फिजिक्सचा खून' म्हटले आहे, तर काहींनी 'हे पाहण्यापूर्वी माझे डोळे का खराब झाले नाहीत', अशी खंत व्‍यक्‍त केली आहे.  एका यूजरने तर 'हे पाहून रजनीकांत अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत' अशी कमेंट केली आहे. एका युजरने तर मराठी मालिकेतील एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यात ट्रेड माईलवरून घसरल्यामुळे हिरो हिरॉईनला कुंकू लावल्याच दिसत आहे.

"गतीच्या सिद्धांतात हा अपवाद कसा घडला हे जाणून घेण्यात न्यूटनलाखूप रस आहे." अशी अफलातून कमेंट एकाने केली आहे. अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्‍या आहेत.

या सीनमध्ये अभिनेत्री ड्रेसिंग टेबलजवळ तयार होत असलेली दिसत आहे,अभिनेताही तिथेच उभा आहे. टेबलावरून कंगवा उचलत असताना त्याच्या हातातजवळ चुकून कुंकू लागते. केस विंचरताना समोर असलेल्या मुलीच्या डोक्यावर कुंकू पडत असल्याचे दिसत आहे. या सीनवर अनेक प्रेक्षकांनी कमेंट केल्या आहेत.

बॉलीवूडच्या चित्रपटांमध्येही असे अनेक सीन

हे सगळे फक्त 'सास-बहू' मालिकांमध्येच घडतंय अस तुम्हाला वाटत असेल पण तसे नाही. बॉलीवूडच्या मोठ्या चित्रपटांमध्येही असे अनेक सीन तुम्हाला पाहायला मिळतील. करीना कपूर, राणी मुखर्जी आणि हृतिक रोशन यांचा २००२ मधील 'मुझसे दोस्ती करोगे' चित्रपट आठवतोय का? चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अचानक वारं येतं, प्लेटवर ठेवलेल्या दिव्यांनी हृतिकची बोटे भाजतात. यावेळी हृतिक हात झटकत असताना ताटात ठेवलेले कुंकू स्लो मोशनमध्ये राणी मुखर्जीच्या डोक्यावर पडते.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT