पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमध्ये मंगळवारी झालेल्या हिंसाचारात दोन जण ठार झाले, तर अन्य तीन जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. इंफाळ पश्चिम सीमेवरील लमशांग भागातील कडंगबंद गावाजवळ काही अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी एका छावणीवर गोळीबार केल्याची घटना घडली. (Manipur Violence)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नॉन्गथोम्बम मायकेल (वय ३३) आणि मेस्नाम खाबा (वय २३) असे दोन गावचे स्वयंसेवक या हल्ल्यात ठार झाले. हल्ल्यानंतर, छावणीच्या स्वयंसेवकांनी प्रत्युत्तर दिले, परिणामी दोन्ही बाजूंमध्ये गोळीबार झाला. कांगपोकपी आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात सशस्त्र हल्लेखोरांमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले," असे पोलीस नियंत्रण कक्षाने एका निवेदनात म्हटले आहे. (Manipur Violence)
या हल्ल्यानंतर कडंगबंद आणि शेजारच्या कौत्रुक गावात महिला आणि मुलांसह अनेक लोक सुरक्षित ठिकाणी पळून गेले. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी या भागात रवाना करण्यात आले.
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारामुळे कौत्रुक आणि कडंगबंद गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कुकी आणि मेईतेई समुदायांमधील प्रतिस्पर्धी गटांमधील अनेक सशस्त्र संघर्ष उफाळला आहे. मे २०२३ पासून, मणिपूर वांशिक तणावाशी झुंजत आहे.
हेही वाचा :