पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय वेषभूषा परंपरेतील सर्वात सुंदर पोशाख कोणता? असा प्रश्न विचारला तर सर्वात पहिल्यांदा नाव येते ते साडीचे. जगभरात भारतीय महिलांची ओळख सांगणारा हा पोशाख अशीही तिची ओळख आहे. काळाचा औघात फॅशन बदलते मात्र भारतीय साडीची असणारी ओळख आजही कायम आहे. मात्र साडी ही केवळ गृहिणी किंवा सण आणि समारंभातच वापरावी, असाही अलिखित नियम झाला आहे. त्यामुळे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ( साहसी खेळ ) गिर्यारोहm, बाईक चालवणे असो की स्टेटिंग करणे फक्त पाश्चात्य ड्रेस घालावा हा नियम झाला. मात्र हा नियम भारतीय महिलेने धुडकावला आहे. तिने चक्क नऊवारी साडीत बर्फात स्केटिंगचा थरार अनुभवला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर ( video viral of skiing )तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नऊवारी साडी नेसलेली एक महिला बर्फाच्या मध्यभागी स्केटिंग करत आहे. दिव्या मैया असे तिचे नाव आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा साहसी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिव्याने गुलाबी रंगाची साडी नऊवारी साडी घातली आहे. व्हिडिओमध्ये दिव्या ही 'कौन दिशा में लेकर चले रे बटोहिया' या गाण्यावर साडी नेसून स्कीइंग करताना दिसत आहे.
इंस्टाग्राम वापरकर्ते या व्हिडिओच्या कमेंटमध्ये दिव्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एकाने कमेंट केली आहे की, फोटोग्राफरचेही कौतुक करावे लागेल, त्याने एकही फ्रेम चुकवलेली नाही. अश कमेंट दिव्याला मिळत आहेत.
हेही वाचा :