उपराष्‍ट्रपती जगदीप धनकड. 
Latest

Vice President Jagdeep Dhankhar | ‘गांधीजी महापुरूष, PM मोदी युगपुरूष’ : उपराष्ट्रपती धनखड

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या शतकातील महापुरूष 'महात्मा गांधी' तर या शतकातील युगपुरूष हे नरेंद्र मोदी असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. मुंबई येथे श्रीमद राजचंद्र यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. उपराष्ट्रपतींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वतुर्ळातून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. (Vice President Jagdeep Dhankhar)

पुढे बोलताना राष्ट्रपती धनखड यांनी म्हटले आहे की, महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेने आपल्याला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. तर भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगतीपथावर नेऊन ठेवले आहे जिथे आपल्याला जायचे होते. महात्मा गांधी आणि पंतप्रधान मोदी या दोघांनीही श्रीमद राजचंद्रजींच्या शिकवणीचे प्रतिबिंब दाखवलं असल्याचेही धनखड यांनी यावेळी म्हटले आहे. (Vice President Jagdeep Dhankhar)

भारत ही शतकानुशतके महापुरुषांची जननी आहे. भारत हे जागतिक संस्कृतीचे केंद्र आहे. भारतीय संस्कृती ५ हजार वर्षांहून अधिक जुनी आहे. जगात असा कोणताही देश नाही ज्याची सभ्यता आपल्या देशाइतकी प्राचीन आणि समृद्ध आहे. आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य पहा, श्रीमद राजचंद्र जयंती, कार्तिक पौर्णिमा आणि प्रकाश पर्व या एकाच दिवशी होणारी सभा आपल्या संस्कृतीची खोली दर्शवते, असेही उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. (Vice President Jagdeep Dhankhar)

Vice President : उपराष्ट्रपतींच्या वक्तव्यानंतर राऊतांचा हल्लाबोल

उपराष्ट्रपतींच्या राष्ट्रपीता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, २०१४ नंतरही तुम्ही तुमच्या शब्दावर ठाम राहा. कोण 'पुरुष', 'महापुरुष' की 'युगपुरुष' हे आम्ही ठरवत नाही. इतिहास, शतके आणि जगभरातील लोक हे ठरवतात. महात्मा गांधींना साऱ्या जगाने पूज्य केले होते. सरकारमध्ये बसणारेही 'पुरुष' असते, तर जम्मू-काश्मीरमध्ये रोज आपले जवान शहीद झाले नसते, चीन लडाखमध्ये घुसला नसता, असे जोरदार टीका राऊत यांनी या वक्तव्यावरून केली आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT