पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध तेलुगु अभिनेते चंद्र मोहन यांचे वयाच्या ८० व्या वर्षी हार्ट ॲटॅकने निधन झाले. हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Telugu actor Chandra Mohan) त्यांनी ९३२ चित्रपटात काम केले तर १५० चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. आजारी असल्याने त्यांना शनिवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. (Telugu actor Chandra Mohan)
संबंधित बातम्या –
त्यांचे खरे नाव मल्लमपल्ली चंद्रशेखर राव असे होते. चंद्र मोहन यांचा जन्म २३ मे, १९४३ रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात पमैदिमुक्कला गावात झाला हता. रंगुला रत्नम या १९६६ रोजी रिलीज झालेल्या तेलुगु चित्रपटातून त्यांना ओळक मिळाली. राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा नंदी पुरस्कार त्यांना मिळाला होता.