पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई ते गांधीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा गुरूवारी (दि. ६) अपघात झाला. यामध्ये रेल्वे इंजिनचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. रेल्वेच्या समोर म्हशी आडव्या आल्याने ही दुर्घटना घडली. गुजरातच्या वातवा स्टेशनवरुन मणिनगरच्या दिशेने येत असताना वंदे भारत एक्सप्रेस म्हशींच्या कळपाला धडकली. वंदे भारत एक्सप्रेसच्या अपघाताबाबतची माहिती पश्चिम रेल्वेचे पीआरओ जे. के. जयंती यांनी दिली आहे. (Vande Bharat Express)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेसचे उद्धाटन केले होते. रेल्वेचे पीआरओ प्रदिप शर्मा याबाबत बोलताना म्हणाले की, या दुर्घटनेने रेल्वेच्या इंजिनाचे नुकसान झाले आहे. मात्र, रेल्वे नेहमीच्या वेळेत स्टेशनवर पोहचली. या अपघाताचा रेल्वेवर कोणताही परिणाम झालेला नाही. (Vande Bharat Express)
प्रदिप शर्मा म्हणाले की, रेल्वे इंजिनचे जे नुकसान झाले आहे. ते दुरुस्त करण्यात येईल. रेल्वे वेळेवर पोहचण्यासाठी काळजी घेण्यात येईल. तर रेल्वे अधिकारी म्हणाले की, गुजरातमधील गाय आणि म्हशी संभाळणाऱ्या राहिवाश्यांना वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेबाबत माहिती नाही. यामुळेच रेल्वे म्हशींना धडकली आहे. याबाबत गुजरात मधील नागरिकांना जागृत करण्यासाठी अभियान राबवले जाणार असल्याचेही अधिकारी यावेळी बोलताना म्हणाले. (Vande Bharat Express)
भारतातील सर्वांत आधुनिक आणि नवीन सुविधा उपलब्ध असेलली वंदे भारत एक्सप्रेसला ३० सप्टेंबरला सुरूवात झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसला सुरूवात केली होती. तसेच मोदींनी या रेल्वेने गांधीनगर ते अहमदाबाद असा प्रवास देखील केला होता. (Vande Bharat Express)