Latest

Uttarkashi Tunnel rescue : बचाव कार्याचा शेवटचा टप्पा थांबला; ऑगर मशीनमध्ये बिघाड, दिल्लीहून तज्ज्ञ दाखल

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशी बोगद्यावरील बचावकार्य अंतिम टप्प्यात पोहोचले असून, लवकरच अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता फक्त सहा मीटर खोदकाम बाकी आहे ते काही तासांत पूर्ण होणे अपेक्षित असतानाच ऑगर मशीन बिघडली आहे. मशीनमध्ये बिघाड झाल्याने खोदकाम बंद करण्यात आले आहे. मशीन दुरुस्त करण्यासाठी दिल्लीतील ७ तज्ज्ञ हेलिकॉप्टरने उत्तरकाशीला पोहोचले आहेत. (Uttarkashi Tunnel rescue)

उत्तरकाशी बोगद्यातील मदतकार्याचा आज १२ वा दिवस आहे. आता फक्त ६-८ मीटर ड्रिलिंगसाठी शिल्लक आहे. ८ वाजता चिनूक हेलिकॉप्टर चिन्यालिसौर विमानतळावर उतरेल. कामगारांना एअरलिफ्ट करण्याची गरज भासल्यास त्याची मदत होणार आहे. बोगद्याच्या बाहेर रुग्णवाहिकाही उपस्थित असून सर्व प्रकारच्या सेवा व मदतीची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णवाहिका सध्या बोगद्याच्या बाहेर थांबल्या आहेत आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी दिल्लीतील सात तज्ञांची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. बचाव अधिकारी हरपाल सिंग यांनी एएनआयला सांगितले की, "क्षैतिज ड्रिलिंगद्वारे ४४ मीटरचे पाईप ढिगाऱ्यात टाकण्यात आले होते, परंतु एनडीआरएफ कर्मचार्‍यांना स्टीलचे रॉड सापडले जे मशीन कापू शकत नव्हते. एनडीआरएफचे कर्मचारी ते रॉड कापतील, त्यानंतर आम्ही पुन्हा मशीन वापरू." (Uttarkashi Tunnel rescue)

बचाव कार्याचा शेवटचा टप्पा थांबला

बुधवार संध्याकाळपासून बचाव कार्याचा शेवटचा टप्पा थांबला होता. खोदकामात अडथळा ठरणारे लोखंडी रॉड एनडीआरएफने हटवले. ८०० मिमी स्टील पाईपचे संरेखन अडथळ्यामुळे वाकले आहे. ते दुरुस्त करण्यासाठी दिल्लीहून तज्ज्ञांचे पथक बोलावण्यात आले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT