किंग्जस्टन; वृत्तसंस्था : कॅरेबियन देश जमैकाचा प्रसिद्ध खेळाडू उसेन बोल्ट (Usain Bolt) आता कंगाल झाला आहे. त्याची आयुष्यभराची कमाई आणि निवृत्तीचे पैसे अचानक गायब झाले. बोल्टने ऑलिम्पिकमध्ये 8 वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. निवृत्तीनंतर आता तो पुन्हा या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. उसेन बोल्टची 12.8 मिलियन डॉलरची (सुमारे 98 कोटी रुपये) फसवणूक झाली आहे.
बोल्टच्या गुंतवणूक खात्यातून 98 कोटी रुपये गायब झाले आहेत. त्याचे खाते एसएसएल (स्टॉक्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड) कंपनीत होते. ही जमैकन गुंतवणूक कंपनी आहे. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने एका पत्राचा हवाला देत या प्रकरणाची माहिती दिली आहे. बोल्टच्या वकिलाने हे पत्र कंपनीला पाठवले असून, त्यात त्याचे पैसे परत करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Usain Bolt)
बोल्टला 11 जानेवारीला पहिल्यांदा कळले की, त्याचे पैसे गायब झाले आहेत. यानंतर बुधवारी त्याच्या वकिलांनी कंपनीकडून दहा दिवसांत पैसे परत करावेत, अन्यथा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी मागणी केली आहे. आणखी एका अहवालात असे म्हटले आहे की, आठ दिवसांत पैसे परत न केल्यास बोल्ट हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेण्याची योजना आखत आहे. बोल्टच्या खात्यात 12.8 दशलक्ष होते, जो त्याच्या निवृत्तीचा आणि आजीवन बचतीचा भाग होता. त्याचे वकील लिंटन पी. गॉर्डन यांनी सांगितले की, आता बोल्टकडे फक्त 12000 डॉलर (सुमारे 10 लाख रुपये) शिल्लक आहेत. त्याच वेळी कंपनीने या प्रकरणात कोणतेही विधान जारी केलेले नाही.
उसेन बोल्टची कारकीर्द
त्याने ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 8 वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. 2018 मध्ये, बोल्ट सर्वाधिक मानधन घेणार्या खेळाडूंच्या यादीत 45 व्या क्रमांकावर होता. त्याचा पगार सुमारे 1 मिलियन डॉलर होता. त्याच वेळी, त्याची जाहिरातींमधून कमाई 30 दशलक्ष झाली आहे. उसेन बोल्टने एकूण 3 ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यादरम्यान त्याने वैयक्तिक स्पर्धांमध्ये 8 सुवर्णपदके जिंकली आहेत. एकूण 8 सुवर्ण जिंकण्यासाठी तो केवळ 115 सेकंद धावला आहे. त्याने 119 दशलक्ष डॉलर्सची बक्षीस रक्कम जिंकली आहे. म्हणजेच प्रति सेकंद या खेळाडूने 8 कोटी रुपये कमावले आहेत.
हेही वाचा;