US President Threaten 
Latest

US President Threaten : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना जीवे मारण्याची धमकी देणारा FBI च्या कारवाईत ठार

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : US President Threaten : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना जीवे मारण्याची धमकी देणार FBI च्या कारवाईत ठार झाला आहे. मयत आरोपी हा अमेरिकेच्या यूटा येथील राहणारा होता. बायडेन हे यूटा येथील दौऱ्यावर येणार होते. त्यापूर्वी काही तास आधी FBI ने आरोपीच्या ठिकाणावर छापेमारी केली. नंतर सुरक्षा एजन्सीच्या कारवाईत तो मारला गेला आहे.

FBI कडून मृत्यूची पुष्टी

FBI ने आरोपीच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. FBI ने सांगितले की त्याच्या विशेष एजंट्सनी आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने आक्रमकपणे विरोध केला. त्यामुळे कारवाई दरम्यान तो ठार झाला. सुरक्षा एजंन्सीजने आरोपीची ओळख जाहीर केलेली नाही. मात्र, माध्यमांच्या माहितीनुसार, यूटाच्या संघीय अभियोजकने जी तक्रार नोंदवली आहे, त्यात आरोपीचे नाव क्रेग रॉबर्टसन, असे ठेवण्यात आले आहे.

US President Threaten : सोशल मीडियावरून दिली होती धमकी

याबाबत अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रेग रॉबर्टसन जवळपास 70 वर्षांचा होता. त्याने आपण माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कट्टर समर्थक असल्याचे म्हटले होते. रॉबर्टसन ने सोशल मीडिया पोस्ट टाकून बायडेन यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या पोस्टमध्या आरोपी रॉबर्टसन याने लिहिले होते की, "बायडेन यूटा येथे येत असल्याचे मी ऐकले आहे. मला माझी एम 24 स्नाइपर राइफल वरील धूळ साफ करायची आहे. विदुषकांच्या प्रमुखांचे स्वागत आहे," अशी उपहासात्मक टोलेबाजी करत पोस्ट टाकली होती.

US President Threaten : उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनाही दिली होती धमकी

याशिवाय आरोपीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप करणाऱ्या मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नी अॅलविन ब्रॅग, उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि अमेरिकेचे अॅटर्नी जनरल मेरिक गारलँड यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपी रॉबर्टसनने सोशल मीडियावर त्याच्या शस्त्रांची छायाचित्रे देखील पोस्ट केली, ज्यात अर्ध-स्वयंचलित रायफलचा समावेश आहे, ज्याला आरोपीने 'डेमोक्रॅट इरेडिकेटर' असे नाव दिले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT