Latest

उर्वशी रौतेला हिच्या ‘त्‍या’ निळ्या गाउनवर चाहते फिदा; किंमत पाहून शुध्द हरपेल

निलेश पोतदार

बॉलिवूडची स्‍टाईल आयकॉन आणि सर्वोत्‍कृष्‍ट फॅशनिस्‍टा म्‍हणून ओळख असलेली उर्वशी रौतेला ही तिच्या नवनव्या ड्रेस आणि फॅशनमुळे चर्चेत असते. उर्वशी आंतरराष्‍ट्रीय 'वर्साचे बेबी' या गाण्यात दिसून आली. या माध्यमातून ती आतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील चमकत आहे. उर्वशी रौतेला नुकत्‍याच पार पडलेल्‍या फिल्‍मफेअर पुरस्‍कार सोहळ्यात सहभागी झाली. या सोहळ्यात ती इतर तारकांपेक्षा साहजिकच सुंदर आणि लक्षवेधी ठरली.

उर्वशीला फिल्‍मफेअर पुरस्‍कार सोहळ्यात आयकॉन ऑफ द इयर पुरस्‍काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात तिने ५० लाखांचा डिझायनर गाउन परिधान करून आली होती. फिल्‍मफेअर पुरस्‍कार मिळाल्‍यानंतर तिने एक व्हिडिओ पोस्‍ट केला.

या व्हिडिओमध्ये उर्वशी निळ्या रंगाच्या हेवी एम्‍बेलिश्ड डिझायनर हाय स्‍लिट कट ड्रेसमध्ये दिसत आहे. ज्‍याला डिझायनर मायकल सिन्कोने डिझाइन केले आहे. या ड्रेसमध्ये उर्वशीच सौंदर्य आणखीनच खुलून आल्‍याचं दिसून आले.

या सोहळ्यात तिने आभाराचे भाषण केले. या व्हिडिओला कॅप्शन देताना उर्वशीने थँक यू फिल्‍मफेअर म्‍हटले आहे. उर्वशी या ड्रेसमध्ये एखाद्या सुंदर निलपरी सारखीच दिसत आहे.उर्वशीच्या चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर, उर्वशी सध्या एका मोठ्या बीग बजेट सायन्स फिक्‍शन तमिळ चित्रपटात दिसणार आहे.

ज्‍यामध्ये ती माइक्रोबायोलॉजिस्‍ट आणि एक आयआयटीयनची भूमिकेत दिसेल. तसेच ती ब्‍लॅक रोज आणि थिरूतु पयले २ च्या हिंदी रिमेक मध्ये दिसणार आहे. उर्वशीला गुरू रंधावा सोबतच्या 'डूब गए' आणि मोहम्‍मद रमादान सोबतच्या 'वर्साचे बेबी' ला चांगला प्रतिसाद मिळाला.

उर्वशी जियो स्‍टूडियोच्या वेब सिरिज 'इन्स्‍पेक्‍टर अविनाश' मध्ये रणदीप हुड्डा सोबत मुख्य भूमिकेत दिसेल. ही सुपर कॉप अविनाश मिश्रा आणि पूनम मिश्रा यांच्या सत्‍य घटनेवर आधारित बायोपिक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT