Latest

Urfi Javed : उर्फीचा ड्रेस पाहून नेटिझन्सची सटकली; म्‍हणाला काल हिचे आयब्रो गायब आज…

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन : उर्फी जावेद (Urfi Javed) कुणाला माहिती नाही म्‍हणायचे तसे काही कारण उरलेले नाही. कारण तिने तीच्या जगावेगळ्या पोशाखांनी सगळ्या नेटकऱ्यांचे लक्ष आपल्‍याकडे वळवून घेतलंय. तिचे विविध रंगी आणि विविध ढंगी पोशाख पाहिले की ती पृथ्‍वीवरचीच आहे की परग्रहावरची असा प्रश्न काही नेटकऱ्यांकडून विचारला जात असतो. सध्या अशाच एका पोशाखाने ती चर्चेत आली आहे. चर्चेत राहण्यासाठीच तीने हा उपद्व्याप केलाय हे सांगायला नको.

उर्फीचा (Urfi Javed) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्‍यामध्ये उर्फीने निळ्या रंगाचा एक विचित्र शॉर्ट टॉप परिधान केलेला आहे. या शॉर्ट टॉपमध्ये आणखी एक नाविण्य म्‍हणजे तिचे हात मात्र गायब झाले आहेत. म्‍हणजे तिचे हात त्‍या टॉपच्या आतमध्ये घातले आहेत. त्‍यात एका नेटकऱ्याने कमेंट करताना अरे हिचे काल आयब्रोज गायब होते आज हिचे हात गायब झालेत हिचं काय चाललंय असे तो म्‍हणाला. त्‍यातच या व्हिडिओत ती एका भिकाऱ्याला पैसे देताना दिसत आहे. तीचे हात दिसत नसले तरी तीने मोठ्‍या मनाने त्‍या भिकाऱ्याला पैसे दिल्‍याचे दिसत आहे.

उर्फी (Urfi Javed) आली आणि नेटकऱ्यांनी तिला ट्रोल नाही केले तर कसं चालेल. मग काय ट्रोलर्सनी तीला घेतलं निशाण्यावर आणि पाडला कमेंटचा पाउस, एकतर म्‍हणाला हिला कुणी बनवलंय. तर काहींनी तीचे एक्‍स्‍प्रेशन पाहून तीचे तोंडभरून कौतुकही केलंय. शेवटी अशा ट्रोलर्सच्या कौतुकामुळेच उर्फीला पुन्हा नव्या अवतारात अवतरण्याची प्रेरणा मिळत असते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT