bagheera movie  
Latest

Bagheera : KGF नंतर मोठी घोषणा, ‘बघीरा’ बॉलिवूडला देणार धक्का

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

सुपरहिट केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी मोठी घोषणा केली असून साऊथचा आणखी एक चित्रपट बॉलिवूड धक्का देण्यास तय़ार आहे. 'बघीरा' (Bagheera) असे या नव्या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा अभिनेता श्री मुरली असेल. तो आधी 'उग्राम' चित्रपटात दिसला होता. दिग्दर्शक प्रशांत नील आणि प्रोडक्शन हाऊसने चित्रपटाच्या पोस्टरनंतर आता मुहूर्ताचे फोटो शेअर केले आहेत. ट्विटरवरून यशचा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट KGF Chapter २ च्या निर्मात्यांनी त्यांच्या या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. (Bagheera)

प्रोडक्शन हाऊस होंबळे फिल्म्सने शुक्रवारी घोषणा केली की ते नवीन कन्नड अॅक्शन फिल्म बनवणार आहोत. या चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले आहे. चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये चित्रपटाचे स्टार आणि दिग्दर्शक सुरी मंदिरात पूजा करताना दिसत आहेत. यासोबतच चित्रपटाच्या क्लॅप बोर्डचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. बघीरा चित्रपटाच्या टीमला प्रशांतने शुभेच्छा दिल्या आहेत. बघीरा या चित्रपटाचे शूटिंग कर्नाटक आणि हैदराबादमध्ये होणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, बघीराने १२०० कोटींचा टप्पा पार केला आहे. २०२० मध्ये, प्रशांत नीलने अभिनेता श्री मुरलीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बघीराचे पोस्टर्स शेअर केले होते. तसेच प्रशांत नील यांनी सांगितले होते की, त्याने आपल्या पहिल्या मास हिरोसाठी वीरतेची कथा लिहिली आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अनेक चाहत्यांनी मुरलीचे फोटोही शेअर केले आहेत.

सध्या प्रशांत नील त्यांच्या नवीन चित्रपट KGF Chapter 2 च्या यशाचा आनंद घेत आहेत. यशने या चित्रपटात रॉकी भाईची भूमिका साकारली होती. २०१८ मध्ये आलेल्या KGF च्या या सीक्वलमध्ये, कोलार गोल्ड फील्ड्सची कहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने जगभरात १२०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT