नवज्योतसिंग सिद्धू यांनी आत्मसमर्पणासाठी सुप्रीम कोर्टाकडे मागितला वेळ | पुढारी

नवज्योतसिंग सिद्धू यांनी आत्मसमर्पणासाठी सुप्रीम कोर्टाकडे मागितला वेळ

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना १९८८मधील रोड रेज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दरम्यान, त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आत्मसमर्पण करण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ न्यायालयाकडे मागितला आहे. याबाबत त्यांचे वकील ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु न्यायालयाने त्यांना हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर ठेवण्यास सांगितले आहे.

दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू यांचे समर्थक शेरी रियार यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून ढासळत आहे. त्यांच्या यकृतात समस्या होती, ती मोठ्या कष्टाने बरी झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांनी प्रकृतीचे कारण देत न्यायालयाकडे वेळ मागितला आहे.

काय प्रकरण होते

२७ डिसेंबर १९८८ च्या संध्याकाळी सिद्धू त्याचा मित्र रुपिंदर सिंह संधूसोबत पटियालाच्या शेरवाले गेट मार्केटमध्ये गेला होता. यावेळी मार्केटमध्ये पार्किंगवरून ६५ वर्षीय गुरनाम सिंग यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यादरम्यान सिद्धूने गुरनाम सिंग यांना धक्काबुक्की केली. पीडितेला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला १ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर यावर फिर्यादी पक्षाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने १५ मे २०१८ रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवला होता. ज्याने सिद्धूला रोड रेज प्रकरणात खून न करता दोषी ठरवले होते. आणि त्यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला ज्येष्ठ नागरिकाला हेतुपुरस्सर दुखापत केल्याबद्दल दोषी ठरवले असले तरी, त्यांनी त्यांना तुरुंगात टाकले नाही आणि १ हजार रुपये दंड ठोठावला. भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ अन्वये, या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त एक वर्ष तुरुंगवास किंवा १ हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button