Latest

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपुरात दाखल, तलावाच्या ‘फाऊंटन ‘शो’चा घेतला आनंद

backup backup

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे शुक्रवारी (दि.१७) रात्री नागपूर विमानतळावर महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी विशेष विमानाने आगमन झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर फुटाळा तलाव येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले.

गृहमंत्री अमित शहा विशेष विमानाने गुवाहाटीवरून नागपुरला पोहोचले. पुढील तीन दिवस ते महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. आज रात्री त्यांचा नागपूर येथे मुक्काम असून उद्या सकाळी पवित्र दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ते अभिवादन करणार आहेत. त्यानंतर रेशीमबागेतील स्मृती भवन येथे ते भेट देणार आहेत. त्यानंतर लोकमत वृत्तपत्राच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते सहभागी होणार आहेत. अमित शहा यांनी फुटाळा तलावावरील जगप्रसिद्ध 'लाईट अॅन्ड फाऊटन शो 'चा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आनंद घेतला. त्यांच्यासाठी आज हा विशेष ट्रायल शो आयोजित करण्यात आला होता.

आज विमानतळावर आगमन झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. कृपाल तुमाने,आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, विकास कुंभारे, मोहन मते, समीर मेघे, टेकचंद सावरकर,कृष्णा खोपडे, विभागीय आयुक्त विजयलक्षमी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन, यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT