Latest

Union Budget 2022 : शालेय शिक्षणासाठी २०० टीव्ही चॅनेल्स सुरु करणार; अर्थमंत्र्यांची घोषणा

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : "शालेय शिक्षणासाठी २०० टीव्ही चॅनेल्स सुरू करणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या रेडिओ आणि टीव्ही चॅनेल्सद्वारे डिजीटल शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. अंगणवाड्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. ", अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत २०२२ चा अर्थसंकल्प मांडत आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, "कोरोना जास्त प्रभाव आपल्या देशावर पडलेला आहे. त्यातून आपल्या देशाची अर्थव्यवस्था हळुहळु सावरत आहे. देशाचा जीडीपी ९.२ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज आहे. पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधेतून गुंतवणूक करणार आहे", असं मत केंद्रीय अर्थमंत्री मंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत मांडलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्पाचे वाचन करत आहेत. त्या संसदेत #Budget2022 सादर करत आहे. यंदाचा अर्थसंकल्प पेपरलेस असून त्या टॅबच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात २०४७ पर्यंतची रुपरेषा आखली गेलीय. पंतप्रधान गती शक्ती योजना ही पायाभूत सुविधांसाठी आहे, त्यात मोठी गुंतवणूक करणार देशात ६० लाख नव्या नोकऱ्या मिळणार आहेत. देशाचा जीडीपी ९.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाला सुरुवात, निर्मला सीतारामन संबोधित करत आहेत.

हे वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT