Latest

Israel offensive | भयंकर : इस्रायल-हमास संघर्षात गाझामध्ये १३ हजार चिमुकल्यांचा बळी

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलच्या गाझा पट्टीत सुरू असलेल्या लष्करी कारवाईत आतापर्यंत १३ हजार मुलांचा बळी गेला आहे, तर अनेक मुलं कुपोषणाच्या दुष्टचक्रात सापडत आहेत, अशी माहिती UNICEF या संस्थेने दिली आहे. कुपोषणग्रस्त मुलांमध्ये आता रडण्याचेही त्राण राहिलेली नाहीत, असे या संस्थेने म्हटले आहे. Israel offensive

UNICEF (United Nations Children's Fund) ही संस्था मुलांसाठी काम करते. या संस्थेच्या कार्यकारी संचालक कॅथरिन रसेल यांनी ही गाझातील मुलांबद्दल माहिती एका मुलाखतीत दिली आहे. त्या म्हणाल्या, "या संघर्षात जखमी झालेल्या मुलांची संख्या हजारांत आहे आणि ही मुले कुठे आहेत, याचीही माहिती आम्हाला नाही. जगभरातील विविध भागातील संघर्ष आम्ही पाहिलेला आहे, पण इतक्या संख्येने मुलांचा बळी जाण्याची ही पहिलीच घटना आहे." Israel offensive

"बरीच मुलं आमच्याकडे दाखल आहेत. या मुलांना अॅनिमिया झालेला आहे. मुलांचा हा वॉर्ड पूर्ण शांत असतो, कारण या मुलांमध्ये रडण्याचेही त्राण राहिलेले नाहीत," असे त्या म्हणाल्या. या मुलांच्या मदतीसाठी जे साहित्य, सामान येत असते त्यांची वाहतूकही आव्हानात्मक बनली आहे.

गाझात ३१ हजार नागरिकांचा बळ | Israel offensive

८ ऑक्टोबरला २०२३ला हमासने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला, यात १२०० इस्रायली नागरिकांचा बळी गेला. त्यानंतर हमास आणि इस्रायल असा संघर्ष यातून सुरू आहे. इस्रायलच्या कारवाईत गाझा पट्टीत ३१ हजार लोकांचा बळी गेला आहे. या संघर्षात इस्रायलवर वंशसंहाराचा आरोप होत आहे, तर दुसरीकडे इस्रायलने हे आरोप फेटाळले आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT