Rashmika Mandanna पुरुषांच्या अंडरवेअरच्या जाहिरातीवरून ट्रोल! 
Latest

Rashmika Mandanna पुरुषांच्या अंडरवेअरच्या जाहिरातीवरून ट्रोल!

रणजित गायकवाड

मुंबई; पुढारी ऑनलाईन : rashmika mandanna vicky kaushal troll : राष्ट्रीय क्रश आणि साउथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका सध्या ट्रोल होत आहे. या ट्रोलिंग मागे पुरुषांच्या अंडरवेअरची जाहिरात कारणीभूत आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना आपल्या दिलखेच अदा आणि सुंदर डोळ्यांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत आली आहे. त्यामुळे तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'राष्ट्रीय क्रश'पर्यंत मजल मारली. पण सध्या ती एका जाहिरातीमुळे ट्रोल होत आहे.

सध्या टीव्हीवर विकी कौशलसोबत पुरुषांची अंडरवेअर जाहिरात दाखवली जात आहे, ज्यात रश्मिकाच्या काही अदांवर चाहत्यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे. काही चाहते भडकलेही आहेत. परिणामी सोशल मीडियावर रश्मिकाला जोरदार ट्रोलचा सामना करावा लागत आहे.

काही युजर्सनी विकी आणि रश्मिका या दोघांनाही टार्गेट करत ट्रोल केले आहे. चाहत्यांकडून या दोघा कलाकारांचा ट्विटरवर वर्ग घेतला आहे. युजर्सच्या कमेंटवरून असं दिसत आहे की, त्यांना ही जाहिरात आवडलेली नाही.

काय आहे जाहिरात….

पहिला भाग….

रश्मिका मंदाना या जाहिरातीमध्ये योगा इंस्ट्रक्टर आहे. तिचा योगा क्लास सुरू असतो. त्या क्लासमध्ये विकी कौशलचाही सहभाग आहे. विकी योगासन करत असतो. यावेळी तो दोन्ही हात वर करतो, तेव्हा त्याचा टी-शर्ट वर येतो ज्यामुळे त्याच्या अंडरवेअरची ब्रँडींगची पट्टी बाहेर येते आणि त्याचवेळी या पट्टीवर रश्मिकाची नजर पडते. दोघांमध्ये संवाद होतो.

दुसरा भाग…

जाहिरातीच्या दुसऱ्या भागात विकी क्लासमध्ये प्रवेश करतो. तो एका शेल्फजवळ जातो. रश्मिका विकीला शेल्फच्या वरच्या कप्यातून मॅट काढण्यास सांगते. विकी मॅट काढण्यासाठी हात वर करतो. त्यामुळे त्याचा टी-शर्ट वर होतो आणि रश्मिकाची नजर पुन्हा एकदा विकीच्या अंडवेअरच्या ब्रँडींग पट्टीवर जाते.

यापूर्वी अशाप्रकारच्या जाहिराती अनेक झाल्या आहेत. त्यावरून वादही निर्माण झाले आहेत. त्याचप्रमाणे रश्मिका मंदाना आणि विकी कौशल यांच्या अंडवेअरच्या जाहिरातीवरून चाहते भडकल्याचे दिसत आहे.

बातमी स्क्रोर करत खाली गेल्यावर तुम्हाला रश्मिका आणि विकी कौशल यांच्या जाहिरातीचा व्हिडिओ पहायला मिळेल.

एका ट्विटर वापरकर्त्याने ट्विट केले आणि लिहिले, 'प्रिय रश्मिका, तुझी जाहिरात पाहिली, तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती कारण तू राष्ट्रीय क्रश आहेस आणि लाखो लोकांची धडकन."

रश्मिका मंदना आणि विकी कौशल अंडरवेअरच्या जाहिरातीवरून ट्रोल होत आहेत.

रश्मिकाच्या पुष्पा या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यात तिचा लूक पूर्णपणे वेगळा आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अल्लू अर्जुन दिसणार आहे. त्याचबरोबर विकी कौशल आजकाल 'सरदार उधम', 'साम बहादुर', 'मिस्टर लेले' सारख्या चित्रपटांवर काम करत आहे.

रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका चित्रपटात दिसणार आहे. बिग बींसोबतच्या चित्रपटाचे नाव 'गुडबाय' आहे.

बॉलिवूडचा एक भाग होण्यासाठी रश्मिका मुंबईला स्थलांतरित झाल्याचे सूत्रांकडून समते आहे. त्याचबरोबर विकी कौशलच्या 'सरदार उधम सिंह' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT