Uncategorized

रत्नागिरी : लोटे एमआयडीसीतील रासायनिक कारखान्याला आग

मोहन कारंडे

खेड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधाील एका कारखान्याला रविवारी दि. 22 रोजी सायंकाळी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आहे. सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने ग्रामस्थांच्या मदतीने
आगीवर नियंत्रण मिळवले असून आग लागण्याचे निश्चित कारण समजू शकलेले नाही.

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील संकल्प इंडस्ट्रीज या लहान कारखान्यात रविवारी सायंकाळी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी धुराचे हवेत पसरलेले लोळ पाहून परिसरातील ग्रामस्थ व इतर कंपन्यांमधील कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. लोटे औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांची संकल्प कंपनीत लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काराखान्यामध्ये धोकादायक पद्धतीने ठेवण्यात आलेल्या रसायनांनी पेट घेतल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. एक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कंपनीत झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.

SCROLL FOR NEXT