औरंगाबाद: 'निट'चा अभ्यास करणार्या तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना पिसादेवी परिसरात मंगळवारी (दि.27)
पहाटे उघडकीस आली. या घटनेची नोंद चिकलठाणा पोलिसांनी घेतली आहे. वैष्णवी किशोर सोनवणे (16 रा.जयदत्त रेसिडेन्सी,
पिसादेवी) असे आत्महत्या करणार्या तरुणीचे नाव आहे. वैष्णवी ही 'निट' परीक्षेची तयारी करत होती.
सोमवारी (दि.26) रात्री कुटुंबासमवेत जेवण केल्यानंतर ती अभ्यासासाठी तिच्या खोलीत गेली. रात्री कुटुंबीय झोपी गेल्यानंतर तिने खोलीतील फॅनच्या गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांनी तत्काळ तिला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
वैष्णवीचे वडील किशोर सोनवणे मंडळ अधिकारी आहेत. मूळचे भोकरदन (जि. जालना) येथील हे कुटुंब मुलींच्या शिक्षणासाठी शहरात आले होते. पिसादेवी परिसरातील जयदत्त रेसिडेन्सी येथे त्यांनी घर घेतले होते. किशोर सोनवणे यांना एक मुलगा एक मुलगी आहे. वैष्णवी नीट परीक्षेची तयारी करत होती. वैष्णवीच्या आत्महत्येने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचलंत का?