Uncategorized

Video : तुकोबारायांच्या पालखीचे माळीनगरात स्वागत, उभ्या रिंगणाने भारावले वारकरी

मोनिका क्षीरसागर

माळीनगर(सोलापूर); गोपाळ लावंड : आज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे माळीनगर नगरीत हरिनामाच्या जयघोषात स्वागत करण्यात आले. सकाळी आठ वाजता गावाच्या वेशीवर पोहचताच, ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीचे मोठ्या उत्सवात स्वागत करण्यात आले. यानंतर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या रिंगणासाठी हजारोंच्या संख्येने वारकरी उपस्थित होते. अश्वाने पालखीला वेढा मारून रिंगणामध्ये धाव घेतली, धाव घेतल्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने, वारकऱ्यांच्यात आनंदी वातावरण होते. या पहिल्याच उभ्या रिंगणाने वारीतील वारकरी आणि ग्रामस्थ भारावून गेले.

या ठिकाणी सासवड माळी शुगर फॅक्टरी, शुगरकेन सोसायटी, महात्मा फुले पतसंस्था, मल्टीस्टेट सोसायटी इतर सामाजिक संस्थांच्यावतीनेदेखील स्वागत करण्यात आले. यानंतर मॉडेल हायस्कूलच्या मैदानावर पालखी विसावा व पूजनासाठी आणण्यात आली. यावेळी कारखान्याचे संचालक मोहन लांडे व त्यांच्या पत्नी संध्याताई लांडे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT