Uncategorized

आरोग्याधिकार्‍याला मारहाण करणारा सफाई कर्मचारी अखेर निलंबित

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सफाई कामगाराने आपले वरिष्ठ असलेल्या सहायक आरोग्यधिकार्‍यांना बाहेरील लोक आणून मारहाण केली. याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. गैरवर्तन व शिस्तभंग केल्याने सफाई कामगार्‍याचे सेवानिलंबन करून विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश आयुक्त शेखर यांनी शुक्रवारी (दि.15) दिले आहेत. शंकर मुरलीधर सोनवणे हे त्या सफाई कर्मचार्‍याचे नाव आहे. सोनवणे हा ई क्षेत्रीय कार्यालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.

योग्य काम करीत नसल्याने सहायक आरोग्याधिकारी राजेश भाट यांनी त्याला 22 नोव्हेंबरला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नोटीस दिली म्हणून सोनवणे याने बाहेरील लोक आणून भाट यांना दमदाटी, शिविगाळ करीत मारहाण केली. या घटनेबद्दल सोनवणे याच्या विरोधात भोसरी पोलिस ठाण्यात 5 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला आहे. गैरवर्तन केल्याने तसेच, शिस्तभंग केल्याने महापालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे आयुक्त सिंह यांनी सोनवणे याचे सेवानिलंबन केले आहे. तसेच, विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

कर्मचार्‍याला माहराण होऊनही महासंघ गप्प

आरोग्य विभागाच्या सहाय्यक आरोग्याधिकार्‍याला कार्यालयात येऊन कर्मचार्‍यांसह बाहेरील लोकांनी मारहाण केली. तरीही पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने यासंदर्भात कोणतीही भूमिका घेतली नाही. महासंघाने गप्प राहून या गैरप्रकारास एकप्रकारे समर्थन केल्याने कर्मचारी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT