भारतीय क्रिकेट संघ ( Team India Schedule ) नोव्हेंबर 2021 ते जून 2022 दरम्यान घरच्या मैदानांवर 4 कसोटी, 14 टी 20 आंतरराष्ट्रीय आणि केवळ 3 एकदिवसीय सामने खेळणार आहेत. बीसीसीआयने घोषित केलेल्या या कार्यक्रमात आठ महिन्यांच्या कालावधीत न्यूझीलंड ( नोव्हेंबर- डिसेंबर), वेस्टइंडिज ( फेब्रुवारी 2022), श्रीलंका (फेब्रुवारी-मार्च 2022) आणि दक्षिण आफ्रिका (जून 2022) हे संघ भारताचा दौरा करणार आहेत. या दरम्यान भारतीय संघ डिसेंबर 2021- जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे आणि एप्रिल- मे (2022) मध्ये इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन होईल.
भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे तर, वेस्टइंडिज विरुद्ध ते तीन एकदिवसीय व पाच टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळतील. श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर दोन कसोटी आणि तीन टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळेल. दक्षिण आफ्रिका संघाचा भारत दौरा हा केवळ दहा दिवसांचा असणार आहे. ज्यामध्ये ते पाच टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळतील. एका वर्षाच्या आत ऑस्ट्रेलियामध्ये आणखीन एक विश्वचषक होणार असल्याने आम्ही 14 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने ठेवले आहेत. असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.
चार कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंड विरुद्ध दोन सामने कानपूर आणि मुंबई येथे खेळविण्यात येतील तर, श्रीलंकेविरुद्ध सामन्यांचे आयोजन बंगळुरू आणि मोहाली येथे करण्यात येईल. रोटेशन नियमानुसार निर्धारित षटकांच्या 17 सामन्यांसाठी स्थळाची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये जयपूर, रांची, लखनऊ, विशाखापट्टणम, कोलकाता, अहमदाबाद, कटक, त्रिवेंद्रम, चेन्नई, राजकोट, दिल्ली यांना यजमानपद देण्यात आले आहे.
[visual_portfolio id="40771"]