ऱाजापूर; पुढारी वृत्तसेवा: राजापूर तालुक्यातील दळे येथे एकाच दिवशी तीन नेपाळी कामगारांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील दळे येथील सलीम काझी यांच्या बागेत काम करणाऱ्या तीन नेपाळी कामगारांचा रविवारी रात्री आकस्मिक मृत्यू झाला.
रविवारी सायंकाळी तीन नेपाळी कामगारांची तब्येत बिघडली. त्यांना धारतले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल येथे नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, यांच्यासह लांज्याचे डीवायएसपी श्रीनिवास साळुखे घटनास्थळी दाखल झाले. सोबत राजापुरचे पोलीस निरीक्षक परबकर, नाटे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील आदी तात्काळ रवाना झाले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचलं का ?
पाहा व्हिडिओ- स्त्रीच्या कर्तुत्वाला सन्मान देणारी अमृता फडणवीसांची गणेश वंदना | Exclusive Amruta Fadanvis