Uncategorized

रायगड : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी – राज ठाकरे यांची सदिच्छा भेट

अविनाश सुतार

रायगड : पुढारी वृत्तसेवा : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सहकाऱ्यांसह महाराष्ट्र भूषण, ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ . आप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी आज (दि.१५) सदिच्छा भेट घेतली. Dr. Appasaheb Dharmadhikari – Raj Thackeray

याप्रसंगी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे, अभिजित पानसे, अविनाश जाधव व सरचिटणीस योगेश परुळेकर, उपाध्यक्षा स्नेहल जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते. Dr. Appasaheb Dharmadhikari – Raj Thackeray

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र भूषण, ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा शाल व पुष्पगुच्छा देऊन सन्मान केला. तर धर्माधिकारी कुटुंबीयांच्यावतीने राज ठाकरे यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT