नवी दिल्ली; पुढारी वृतसेवा : राज्यसभेच्या आज (दि.२६) प्रचंड गदारोळ झाला. मंगळवारी (२५ जुलै) माझा राज्यसभेतील माईक बंद करण्यात आला होता. (Parliament Monsoon Session) माझा अधिकारांच गळचेपी झाली, असा आराेप काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
राज्यसभेत खर्गे बोलण्यासाठी उभे हाेते. त्यावेळी काँग्रेसचे सदस्य त्यांच्या मागे उभे राहिले. यावर राज्यसभा सभापतींनी आक्षेप घेतला. काँग्रेसचे सदस्य माझ्यामागे उभे राहणार नाही तर मोदींच्या मागे उभे राहतील का? असा सवाल खर्गे यांनी केला. या वेळी भाजप सदस्यांनी मोदी-मोदी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. राज्यसभेच्या अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते आणि सभागृह नेत्याला आपापल्या सदस्यांना शांत करण्यास सांगितले. गदारोळ कमी न झाल्याने राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.
खर्गे यांनी आज (दि.२६) ट्विट केले की, "मी माझे मुद्दे सभागृहासमोर मांडत होतो. 50 जणांनी 267 वर नोटीस दिल्यावर मला संसदेत बोलण्याची संधीही मिळाली नाही." ठीक आहे; पण मी बोलत असताना माझा माईक बंद झाला, ही माझ्या अधिकाराची गळचेपी आहे.हा माझा अपमान आहे. त्यांनी माझ्या स्वाभिमानाला आव्हान दिले आहे."
मणिपूर हिंसाचार व अत्याचार प्रकरणी आज (दि.२६) संसदेत पुन्हा गदारोळझाला. राज्यसभा सभापतींनी सांगितले की, मी मणिपूरच्या मुद्द्यावर अल्प चर्चेसाठी प्रस्ताव स्वीकारला आहे. कमी कालावधीच्या चर्चेवर अध्यक्षांनी चर्चेसाठी बोलावण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजप नेते भूपेंद्र यादव म्हणाले की, चर्चा होणार हे ठरले आहे, मग गदारोळ का? शेवटी विरोधी पक्षांना सभागृहाचे कामकाज का चालू द्यायचे नाही? असा सवालही त्यांनी केला.
हेही वाचा