Uncategorized

नाशिक : हरतालिका पूजनासाठी महिलांची लगबग

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीया अर्थात हरतालिकेचे सोमवारी (दि.१८) घरोघरी पूजन होणार आहे. यामुळे पूजेसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी रविवारी (दि.१७) महिलावर्गाची बाजारात लगबग पाहायला मिळाली.

संबधित बातम्या :

हिंदू धर्मामध्ये हरतालिका पूजनाची प्राचीन परंपरा आहे. शिवा भूत्वा शिवां यजेत् या भावनेने हरितालिकेचे पूजन केले जाते. हरतालिकेचे हे व्रत कुमारिका आणि सुवासिनी करतात. देशात अनेक भागांत सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांची पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे. पार्वती आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्ती सुशोभित केलेल्या चौरंगावर स्थापना केल्या जातात. या दिवशी वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा केली जाते. षोडशोपचार पूजा करून हरतालिकेसाठी हिरव्या बांगड्या वाहिल्या जातात आणि विविध प्रकारच्या झाडांची पत्री म्हणजे पाने वाहिली जातात. महिलावर्ग या दिवशी संपूर्ण दिवसभर कडक उपवास करतात. दरम्यान, हरतालिका पूजनासाठी महिलावर्गाने मनमुराद खरेदी केली. शहराचा मुख्य भाग असलेल्या रविवार कारंजा, सराफ बाजार, मेनरोड आदी भागांमध्ये पूजेसाठीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी केली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT