Uncategorized

नाशिक : मेडिकलसाठी जागा देण्याचे आमिष दाखवून 12 लाखांची फसवणूक, डॉक्टरांविरोधात गुन्हा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मेडिकलसाठी जागा देण्याचे आमिष दाखवून दोन डॉक्टरांनी १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी पुष्पा योगेश ठोके (रा. स्वामी समर्थनगर, आडगाव) यांनी आडगाव पोलिस ठाण्यात दोन डॉक्टरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पुष्पा यांच्या फिर्यादीनुसार, संशयित डॉ. दिग्विजय प्रकाश अहिरराव (३०, रा. स्वामी समर्थनगर) व डॉ. राहुल सूर्यभान कांडेकर (३५, रा. हिंगणगाव, जि. अहमदनगर) यांनी नोव्हेंबर २०१८ ते ३ एप्रिल २०२३ या दरम्यान, गंडा घातला. दोन्ही संशयितांनी पुष्पा यांना मेडिकल टाकण्यासाठी जागा देण्याचे आमिष दाखवून त्यात आर्थिक गुंतवणूक करण्यास सांगितले होते. त्यानुसार पुष्पा यांनी संशयितांना १२ लाख रुपये दिले होते. मात्र संशयितांनी त्यांना जागा न देता किंवा पैसेही परत न करता गंडा घातला. या प्रकरणी पुष्पा यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार आडगाव पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT