Uncategorized

जळगाव : रॅलीदरम्यान अपघातात तरुणाचा मृत्यू; पालकांकडून जनजागृती

गणेश सोनवणे

जळगाव : जिल्ह्यातील फैजपूर येथील डी. एन कॉलेजमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी 2023 मध्ये एका पक्षाच्या रॅलीत सहभागी झाला होता. दरम्यान अपघातात त्याचा मृत्यू झाला. मात्र, कॉलेजने या घटनेची कोणतीही जबाबदारी घेतली नाही. शिवाय अपघात झाल्याचे उशिरा कळविण्यात आल्याची तक्रारही पालकांनी केली आहे. सदर गुन्हा नोंद असूनही आजपर्यंत या गुन्ह्यात कारवाई न झाल्याचे पालकांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील फैजपूर हे गाव महाराष्ट्रात नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन झाले होते. तसेच काँग्रेसचे नेते मधुकरराव चौधरी यांच्या कारकिर्दीत उभारलेल्या शिक्षण संस्थांमुळे हे गाव संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे.

फैजपूर डीएन कॉलेजमध्ये 2023 ला भुवनेश डालूराम चेजारा शिक्षण घेत होता. त्यावेळी याच कॉलेजमध्ये काँग्रेस पक्षाची विद्यार्थ्यांची रॅली निघाली होती. त्यामध्ये त्याने सहभाग घेतला होता. त्या दरम्यान त्याचा अपघातात मृत्यू झाला.

याबाबत रावेर तालुक्यातील भोकरी केऱ्हाळे येथील राहणारे डालूराम चेजारा यांनी आज कलेक्टर कार्यालयाच्या बाहेर जनजागृती पर बॅनर व गाडीवर पोस्टर लावून  झालेल्या प्रकारवर व शिक्षण संस्थेतील अनागोंदी कारभाराविरोधात ते जनजागृती करत होते. यावेळी ते बोलताना म्हणाले की, दुपारी 12 ला अपघात झाल्यावर आम्हाला सायंकाळी 4.30 वाजेला कळविण्यात आले. या अपघाताबाबत कॉलेज प्रशासन कोणतीच जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद  होऊनही अजून पर्यंत काहीही त्यात झालेले नाही अशी तक्रार त्यांनी यावेळी केली.  विद्यार्थ्यांच्या कॅम्प किंवा सहल किंवा काही इव्हेंट असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी  ही त्या पालकांकडून संमती पत्र भरून घेण्यात येते. मग एखादी राजकीय पक्षाची रॅलीमध्ये कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होताना त्यांच्या पालकांची परवानगी किंवा संमती पत्र का घेण्यात आले  नाही असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला?

मी विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी फिरत आहे व अशा बाबत जनजागृती करीत आहे. याबाबत आमदार शिरीष चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT