Uncategorized

जळगाव : डीडीआर कार्यालयातील अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

अंजली राऊत
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई करत एका कर्मचार्‍यास लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले आहे. यावल तालुक्यातील तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार तक्रारदाराविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल होवू न देण्यासाठी तसेच प्रकरणाच्या प्रती देण्यासाठी व नाशिकच्या अपिलात मदत करण्यासाठी १० हजारांची मागणी करून ती स्वीकारणार्‍या जळगाव सहकार निबंधक कार्यालयातील सहाय्यक सहकार अधिकारी शशीकांत नारायण साळवे यास शुक्रवारी (दि. ९) दुपारी २ च्या सुमारास कार्यालयातच जळगाव एसीबीने अटक केली. या कारवाईने सहकार वर्तुळातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.के.बच्छाव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे, पोलीस कॉन्सटेबल राकेश दुसाने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT