पुढारी ऑनलाईन डेस्क : "महाराष्ट्र राज्य हळुृहळु अराजकतेकडे निघालं आहे. सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. राज्यात दहशतवादी कारवाया सुरू असताना पोलीस आणि एटीएस शांत आहेत. अनिल देशमुख अद्यापही समोर येत नाहीत. महाराष्ट्र कायद्याचं राज्य राहिलंय का", असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उपस्थित केली आहे.
मुंबई पत्रकार परिषदेतून ते पत्रकाराशी संवाद साधत होते. ते पुढे म्हणाले की, "किरीट सोमय्या यांना विनाकारण अटक करण्यात आली. त्यांना स्थानबद्ध कशासाठी केलं? तक्रार दाखल करायला गेलेल्या करुणा शर्मांना खोट्या केसमध्ये अटक करण्यात आली. लखोबा लोखंडे नावाच्या व्यक्तीला सरकारविरोधात बोलल्यामुळे कोर्टाच्या आवारातच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. यामुळे दिवसेंदिवस महाराष्ट्राची बदनामी होत आहे", असंही मत त्यांनी पत्रकार परिषदेत मांडलं आहे.
"आमचे नेते किरीट सोमय्या हे कोल्हापुरात तक्रार करण्यासाठी जात होते. तर त्यांना स्थानबद्ध केलं गेलं. याचा अर्थ तक्रारदारांना स्थानबद्धता आणि गावगुंडांना राज्यता मुक्तता, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे", अशी टीका आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाआघाडी सरकारवर केली.
पहा व्हिडीओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय