Uncategorized

वेरूळ लेणीत ‘हायड्रॉलिक लिफ्ट’चा प्रस्ताव

Shambhuraj Pachindre

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : जागतिक वारसा स्थळापैकी एक असलेल्या वेरूळ लेण्यांत हायड्रॉलिक लिफ्ट बसवण्याचा प्रस्ताव पुरतत्त्व विभागाने पाठवला आहे. या प्रस्‍तावाला मंजुरी मिळाल्‍यानंतर हायड्रॉलिक लिफ्ट असणारे जगातील पहिले स्मारक असण्याचा मान वेरूळ लेण्यांना मिळणार आहे. या सुविधेमुळे ज्येष्ठांना ही लेण्यांचे सोंदर्य न्याहाळता येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कुठलेही बांधकाम होणार नाही…

वेरूळ येथील 16 व्या लेणीत दुमजली रचना आहे. येथून वर जाण्यासाठी पायऱ्यांचा वापर करावा लागते. याचा ज्येष्ठांना त्रास होतो. ही बाब हेरून एएसआय कार्यालयाने या ठिकाणी हायड्रॉलिक लिफ्ट बसवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या संरचनेच्या दोन्ही बाजूने लहान लिफ्ट बनवण्यात येणार आहे. येथे कुठलेही बांधकाम होणार नसून 9 स्क्वेअर फूट जागेत यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यात एका व्हील चेअरवर बसलेली व्यक्ती सहजपणे पहिल्या मजल्यावर जाईल. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

.. तर ज्येष्ठांना न्याहळता येणार लेण्यांचे सौंदर्य

दरम्यान ज्येष्ठांना या लेण्यांचे सौंदर्य न्याहळता येत नव्हते. आता हायड्रॉलिक लिफ्ट झाल्‍यानंतर हे  शक्य होणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT