Uncategorized

Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत दक्षिण कोरियाची जपानवर मात

Arun Patil

भुवनेश्वर, वृत्तसंस्था : हॉकी विश्वचषक स्पर्धेत (Hockey World Cup) द. कोरियाने चमकदार कामगिरी करत जपानचा 2-1 असा पराभव केला. कोरियन संघाचा हा पहिला विजय आहे. तर जपानने दुसरा सामनाही गमावल्याने त्यांना पुढची फेरी गाठणे कठीण झाले आहे. जपानच्या संघाने नेत्रदीपक खेळ सादर केला. संघाला सुरुवातीची आघाडीही मिळाली. मात्र जपानी संघाला आघाडी राखण्यात अपयश आले.

सामन्याच पहिला क्वार्टर अतिशय रोमांचक झाला. खेळ सुरू होताच जपानच्या संघाने आक्रमण केले आणि पहिल्याच मिनिटाला द. कोरियाचे गोलजाळे भेदले. जपानच्या नागयासीने हा गोल केला. यासह त्यांना 1-0 अशी आघाडी मिळाली. पिछाडीवर पडताच द. कोरियाने जोरदार चढाया केल्या. यात त्यांना 8 व्या मिनिटाला यश आले. ली ली जंगजुन याने पहिला गोल द. कोरियाला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणी कोरियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला मात्र त्यांना गोल करता आला नाही.

दुसर्‍या क्वार्टरमध्ये सामना सुरू होताच कोरियाने आक्रमण सुरूच ठेवले आणि गोल करण्याचा प्रयत्न केला. यातच जंगजुनने पुन्हा एकदा 23 व्या मिनिटाला दुसरा गोल करून संघाची आघाडी दुप्पट केली. यानंतर जपानने कौंटर टॅक केले. त्यांच्या यामासाकीने अनेकदा पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश मिळाले नाही. या क्वार्टरमध्ये कोरियन खेळाडू जंग मांजेला ग्रीन कार्ड देण्यात आले. (Hockey World Cup)

तिसर्‍या क्वार्टरच्या सुरुवातीलाच जपानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र त्यांना याचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. यानंतर द. कोरियानेही प्रतिहल्ले सुरूच ठेवले आणि ते सतत जपानी डीमध्ये धडका मारत राहिले. पण जपानचे आपल्यावर आणखी गोल होऊ दिले नाहीत. त्यांनी भक्कम बचाव केला आणि द. कोरियाचे आक्रमण परतवून लावले. या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. अशाप्रकारे या क्वार्टरमध्ये कोरियाच 2-1 ने आघाडीवर राहिला. त्यानंतर चौथ्या क्वार्टरमध्येही द. कोरियाने आपली आघाडी वाचवली आणि जपानवर मात स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला.

हेही वाचा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT