Uncategorized

नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावले दापोलीकडे

Shambhuraj Pachindre

दापोली : वृत्तसेवा

गुलाबी थंडीत पहाट जणू धुक्याची चादर ओढून घेत आहे असे काहीसे विलोभनीय दृश्य दापोलीत पहायला मिळत आहे. मिनीमहाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीला दाट धुक्याने वेढले असून नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांची पावले दापोलीच्या पर्यटनात थिरकली आहेत.

मागील काही दिवसांत वातावरणात गारठा वाढला आहे. पहाटे  सर्वत्र शुभ्र धुक्‍याची चादर पसलेली दिसते. या दाट धुक्यामुळे सूर्यकिरणेही पृथ्वीवर उशिरानेच पोहोचतात. त्यामुळे या गुलाबी थंडीचा आनंद दापोलीकरांसह पर्यटकदेखील घेत आहेत.

चार दिवसांपासून दापोली शहरासह तालूक्यात दाट धुक्‍याची चादर पसरली होती. दापोली आझाद मैदान परिसरातील खुल्या मैदानात गारव्याचा आनंद नागरिक घेत आहेत. गेले चार दिवस पहाटे दाट धुक्‍याची चादर पसरली होती. परंतु रविवार आणि सोमवारी त्यापेक्षाही दाट धुके सर्वत्र पसरले होते.

निसर्गाची वेगवेगळी रूपे आता एकाच दिवसात दिसू लागली आहेत. दाट धुक्‍यांमुळे फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह, शाळकरी मुले, व्यावसायिक तसेच मॉर्निंग वाकला जाणाऱ्या लोकांना धुक्‍यामधून वाट शोधत जावे लागले. भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार आगामी काही दिवस तापमानात चढ-उतार अनुभवास येईल.

हवामानाचा हा लहरीपणा आता आणखी काही दिवस नागरिकांना सोसावा लागणार आहे. असे असले तरी, अनेक महिन्यांनी अनुभवायला मिळालेल्या धुक्‍याचा आनंद नागरिकांना आल्हाददायकच वाटत आहे. यंदा पावसाळ्यातही नागरिकांना उन्हाचा तडाखा सोसावा लागला होता. हिवाळ्याच्या सुरुवातीला काही दिवस थंडी पडल्यानंतर पुन्हा वातावरण गरम होऊ लागले होते.

तशी यंदा थंडीची सुरुवातही उशिराच झाली. पण, आता दाट धुक्‍याची सकाळ उजाडू लागल्याने वेगळाच आनंद अनुभवता येत आहे. धुक्‍यात हरवलेले रस्ते, वृक्ष, डोंगर बघताना मनाला सुखद अनुभूती मिळत असून कोरोनाच्या भयाचे ढग काही प्रमाणात का होईना दूर होत आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT