Uncategorized

एलोन मस्कने ट्विटर हॅंडलरला दिली 5 हजार डॉलरची ऑफर

अमृता चौगुले

पुणे: पुढारी वृत्तसेवा

एलोन मस्कने सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या वैयक्तिक जेटला ट्रॅक करण्यापासून थांबवण्यासाठी एका तरुणाला 5 हजार डॉलरची (अंदाजे 3.75 लाख रूपये) ऑफर दिली आहे. हा तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी असून टेसला आणि Spacex च्या सिइओ च्या खासगी जेट फोलो करत होता. सार्वजनिक डेटाचा वापर करून अनेक हाय-प्रोफाइल व्यक्तींचा मागोवा घेत होता.

नोव्हेंबर 2021 मध्ये, एलोन मस्कला त्याच्या जेटवर पाळत ठेवणाऱ्या @Elonjet या ट्विटर हॅंडलमुळे चिंता वाटू लागली. तेव्हा त्याने हॅंडलचा मालक म्हणजेच 19 वर्षीय जॅक स्वीनीशी संपर्क साधून ट्विटर हॅंडल बंद करण्यासाठी ऑफर दिली; पण स्वीनीने 5 हजार डॉलरची ही ऑफर नाकारली आणि त्याऐवजी 50 हजार डॉलर (अंदाजे ३७.५५ लाख रुपये) मागितले. या पैशातून त्याने त्याचा शैक्षणिक खर्च करून स्वतःसाठी एक कार खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. कदाचित ती कार टेसला मॉडेल 3 सुद्धा असेल.

मस्क आणि स्वीनी यांच्यात ट्विटरवर (DMद्वारे) संवाद झाला. मस्कने स्वीनीवर त्याच्या विमानांचा मागोवा घेण्यासाठी बॉट्स कसे सेट केले आणि हे सगळे करून त्याला काय मिळाले हे शोधण्यासाठी दबाव आणला.

प्रोटोकॉलनुसार, @Elonjet हे स्वीनीने तयार केलेल्या 15 फ्लाइट ट्रॅकिंग हॅंडलपैकी एक आहे. यातील सर्व हॅंडलस् बिल गेट्स आणि जेफ बेझोस यांच्यासह इतर हाय-प्रोफाइल व्यक्तींना फोलो करत आहेत. परंतु मस्कच्या विमानाचा मागोवा घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हँडलला सर्वाधिक फोलोअर्स आहेत.

मस्कने सुरुवातीला सांगितले की तो स्वीनीच्या ऑफरवर विचार करेल, परंतु नंतर म्हणाला, हे हँडल बंद करण्यासाठी पैसे देणे "योग्य नाही." मस्कबरोबरच्या संवादाबद्दल विचारले असता, स्वीनी म्हणाला की काहीशी भीती वाटली पण हा अनुभव चांगला होता. तसेच स्वीनीला भविष्यात मस्कच्या कोणत्याही कंपनीसाठी काम किंवा इंटर्नशिप करण्याची इच्छा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT