Uncategorized

Dhule News | अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्यांविरुध्द पिंपळनेर पोलीसांची धडक कारवाई

गणेश सोनवणे

पिंपळनेर : (जि.धुळे)पुढारी वृत्तसेवा– आगामी लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने पोलिसांनी अवैध दारु विक्रीच्या विरोधात कारवाई केली आहे. पिंपळनेर पोलिसांनी लाखो रुपयांची हातभट्टीची दारु व कच्चे रसायन जप्त केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नाशिक यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे व पोलीस अधीक्षक धुळे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीचे अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक धुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण विभाग साक्री यांचे मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन कापडणीस यांनी आगामी लोकसभा निवडणुक 2024 अनुषंगाने आदर्श आचार संहिता लागु झाले पासुन ते आजपावेतो अवैधरित्या गावठी दारु बनविणारे व विक्री करणारे तसेच विना परमिट देशी विदेशी दारु विकणारे यांचे विरुध्द वेळो वेळी गुप्त बातमीदारा मार्फत माहिती काढुन पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी तसेच गुजरात राज्याच्या सिमे लगत असणाऱ्या गावांमध्ये हातोडे चालवुन आतापर्यंत आरोपीतां-विरुध्द दारुबंदी कायद्यान्वये 16 गुन्हे दाखल करुन गावठी हातभट्टीची दारु व कच्चे रसायन 5468 लिटर व देशी, विदेशी दारू 52.42 लिटर असा एकुण 3,60365/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करुन कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईत पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन कापडणीस, पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे, पोलीस उपनिरीक्षक भुषण शेवाळे यांचे सह पिंपळनेर पोलीस ठाणे येथील स्टाफने केली.

पोलीसांनी केले आवाहन

पिंपळनेर पोलिस ठाण्याचे वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की, पिंपळनेरसह परिसरातील, गावातील कोणी अवैध गावठी हातभट्टीची दारु तयार किंवा विक्री करत असेल त्याबाबची माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्यास कळवावी- सपोनी सचिन कापडणीस

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT