Uncategorized

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : शिक्षणच नव्हे तर व्यक्तिमत्त्व घडविणारे दिल्ली पब्लिक स्कूल

अंजली राऊत

नाशिक : 

शांत आणि हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या नाशिकसारख्या प्रगत शहरात दिल्ली पब्लिक स्कूल अल्पावधीतच उत्कृष्टतेचा एक शैक्षणिक मापदंड बनला आहे. डीपीएसच्या व्हिजननुसार, डीपीएस नाशिक हे त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये देशभक्त, भूमीचा वारसा जोपासणारे आणि संस्कृतीला महत्त्व देणारे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. शैक्षणिक आणि सहशैक्षणिक अभ्यासक्रम यांच्यातील समतोल साधणारे सर्वांगीण शिक्षण डीपीएस नाशिक प्रदान करते. डीपीएस नाशिकमध्ये बालकेंद्रित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आत्मअभिव्यक्ती, संशोधन आणि अनुभवात्मक शिक्षणात गुंतण्यासाठी प्रोत्साहित करते.

गेल्या काही वर्षात शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत चालले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना कृती आणि अनुभव यावर आधारित शिक्षण देण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. या बदलत्या काळानुसार डीपीएस पाऊल टाकत आहे. डीपीएस नाशिक येथे 2040 आणि त्यापुढील जगासाठी शिक्षण देण्याचे ध्येय ठेवण्यात आलेले आहे. अधिकाधिक सामुदायिक गटांपर्यंत पोहोचत तरुण विद्यार्थ्यांमध्ये समाजासाठी अधिकाधिक चांगले काम करण्याचा विश्वास डीपीएस शिक्षणाच्या आणि संस्काराच्या माध्यमातून दृढ करते. संवेदनशील आणि विचारशील व्यक्तिमत्त्व घडवत असतानाच आमचे ब्रीदवाक्य 'स्वयंपुढे सेवा' याला अधिकाधिक मूल्यवान बनवते. एज्युकेशन वर्ल्डने सलग दुसर्‍या वर्षी नाशिकमधील क्रमांक एकची सर्वोत्तम सीबीएसई शाळा म्हणून स्थान मिळवले आहे. डीपीएस नाशिक आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मनिर्भरतेची भावना रुजविते, सांघिक भावना वाढीस लावते आणि एकमेकांना सहकार्य करत शिक्षणाचा आनंद घेण्यास शिकविते. डीपीएस नाशिककडे उत्कृष्ट शिक्षकांचा चमू आहे आणि आमचा तो अभिमान आहे. या शिक्षकांच्या जोरावर आपली अद्वितीय शैक्षणिक प्रणाली आम्ही विकसित केली आहे आणि त्यामुळेच शैक्षणिक संस्थांमध्ये डीपीएसचे नाव अग्रभागी आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे हे आमचे ध्येय आहे. क्रिया-प्रक्रियांवर आधारित म्हणजेच अ‍ॅक्टिव्हिटिवर आधारित शिक्षणाचा पाया डीपीएस नाशिकने भक्कम केला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे आणि नवनवीन कारणांचा शोध घेण्याची जिज्ञासा विद्यार्थ्यांमध्ये रुजविली जात आहे. केवळ पाठांतर आणि पाठ्यपुस्तकी ज्ञानापेक्षा कृतिशील, वैज्ञानिक जिज्ञासा, पर्यावरणाबद्दल जागरुकता या तत्त्वांना डीपीएस नाशिक प्राधान्य देेते. त्यामुळे येथील विद्यार्थी हा भविष्यातील भारताचे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व नक्कीच असेल.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT